कामे नेटाने पार पाडणे स्त्रियांना लाभलेली देणगी : सरिता नरके

सुप्रेम-रेडक्रॉसतर्फे रणरागिणींचा सन्मान, देशदूतच्या डॉ. बालाजीवाले यांचाही समावेश

0
नाशिक | प्रतिनिधी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण आणि संस्कृतीचा मिलाफ घडविणारे विश्व तयार करणे हे आव्हान आजच्या महिला लिलया स्वीकारतील. एकाचवेळी अनेक कामांवर लक्ष ठेऊन ती कामे नेटाने पार पाडणे स्त्रियांना लाभलेली निसर्गदत्त देणगी असल्याचे प्रतिपादन मुद्रांक उपमहानिरीक्षक सरिता नरके यांनी केले.
शहरातील सुप्रेम मेडिकल अँड एज्युकेशन फाऊंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे गुरुवारी(दि. १४) जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा गौरव सोहळा टिळकपथ जवळील रेडक्रॉस सोसायटीत करण्यात आला होता.
या सोहळ्याला मुद्रांक उपमहानिरीक्षक सरिता नरके, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर रेडक्रॉसचे सचिव मेजर पी. एस. भगत, सुप्रेम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, प्रकल्प संयोजिका डॉ. प्रतिभा औंधकर, सुप्रेमचे सचिव शशिकांत चव्हाण उपस्थित होते.
एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले कि, आई जिजाऊ सावित्रीबाई फुले झाशीची राणी या सारख्या स्त्रीधुरिणींनी अलौकिक कार्य करून समाजासमोर नवीन आदर्श ठेवला आहे. त्यांचेच कार्य पण नेटाने पुढे चालवून स्त्री-पुरुषांचा खर्‍या अर्थाने संतुलित समाज निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांच्यासह ८ यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात सुप्रेम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांनी फाऊंडेशनची माहिती दिली.
आत्तापर्यंत फाउंडेशनने राबविलेल्या उपक्रमाची त्यांनी माहिती दिली, तर रेडक्रॉस सोसायटीचे सचिव मेजर (नि) पी. एस. भगत यांनी रेडक्रॉस संस्थेने केलेल्या कामांची माहिती दिली.

या रणरागिणींचा झाला सत्कार
विज्ञान व तंत्रज्ञान -अपूर्वा जाखडी.
पत्रकारिता- डॉ. वैशाली बालाजीवाले.
शैक्षणिक- डॉ. लीना भट.
उद्यमजगत- नीलिमा पाटील.
वैद्यकीय- डॉ. स्मिता कांबळे
कला- विद्या देशपांडे.
क्रीडा – ऐश्वर्या मोरे
पोलीस प्रशासन- सारिका अहिरराव
व आदर्श संस्थेसाठी जिजाऊ महिला सेवाभाववी संस्थेला गौरविण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*