ईव्हीएम, व्हिव्हिपॅटची मतदारांना माहिती द्या : जिल्हाधिकारी

0
नाशिक | प्रतिनिधी मतदान करतांना मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ईव्हीएम व व्हिव्हिपॅट यंत्राबाबत माहिती देऊन जनजागृती करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी निवडणूक शाखेला दिले.
गुरुवारी (दि.१४) जिल्हाधिकारी यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची जिल्ह्यातील एकूण तयारीची माहिती घेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी ईव्हीएम व व्हिव्हिपॅट यंत्रांची प्रात्याक्षिके घेतली. मागील काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम प्रणालीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
त्यापार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी यंंदाच्या लोकसभा निवडणुकीत व्हिव्हिपॅट यंत्राचा उपयोग केला जात आहे. या दोन्ही यंत्राची माहिती मतदारांना देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करुन जनाजगृती करावी, असे आदेश त्यांनी निवडणूक शाखेला दिले.

LEAVE A REPLY

*