एप्रिलपासून बोगस डॉक्टरांविरूद्ध मोहीम

0
नाशिक | प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरूद्ध मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके बोगस डॉक्टरांचा शोध घेईल. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ग्रामीण भागात अनेक स्वयंघोषित डॉक्टरांकडून सर्रास रूग्णांची तपासणी केली जात असल्याच्या तक्रारीवरून बोगस डॉक्टरांविरूद्ध जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मोहिम राबविली होती. यात नांदगाव तालुक्यात बोगस डॉक्टर आढळला होता.
जिल्ह्यात पुन्हा एकादा अशाच प्रकारे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पात्रता नसतानाही रूग्णांवर उपचार केले जात असल्याचे प्रकार समोर येत असल्याने जिल्ह्यातील बोगस डॉक्टर पुन्हा एकदा रडारवर आले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागामार्फेत तालुकानिहाय पथके नेमून त्यांना स्वत:च्या तालुक्यात न ठेवता दुसर्‍याच तालुक्यात बोगस डॉक्टरांची शोध मोहीम राबविली जाणार आहे.
यामध्ये ज्या व्यक्तीच्या नावे प्रमाणपत्र आहे त्याच डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार केले जात आहे का, प्रमाणपत्र एकाचे अन् दुसराच तपासणी करून उपचार करत आहे का, याचा शोध घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*