Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

द्वारका सर्कल १०० मीटरच्या आतील वाहने हटवा; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे आदेश

Share
द्वारका सर्कल १०० मीटरच्या आतील वाहने हटवा; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे आदेश; Dwarka Circle : If a vehicle is set up within a hundred meters, direct action will be taken- Nagre Patil

जुने नाशिक । प्रतिनिधी

सततच्या वाहतूक कोंडीमुळे संपूर्ण शहराची डोकेदुखी ठरणार्‍या द्वारका सर्कलच्या शंभर मीटरच्या आंतमध्ये उभे राहणार्‍या सर्वप्रकारच्या वाहनांना हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले.त्याचप्रमाणे येथील रिक्षा स्टॅण्ड, हातगाडी विक्रेते यांना देखील हटवण्याच्या सुचना करण्यात आली . आता शंभर मीटरमध्ये वाहन उभे केल्यास थेट कारवाई होणार आहे. पादचार्‍यांनी भुयारी मार्गाचा वापर करावा, यासाठी जनजागृती करावी, प्राधिकरण कडून भुयारी मार्गात २ कर्मचारी नियुक्त करावे, त्याच प्रमाणे पोलिस विभागाकडून २ कर्मचारी देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आले.

प्रमाणे पुर्वी प्रमाणे सिग्नल यंत्रना कार्यन्वित करण्यात येईल का याविषयी प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना सुचवण्यात आले. यावेळी एनडिएनव्हिपीच्या आर्किटेक्चरच्या विधार्थी सलोनी कासलीवाल, आशिष वैरागर यांनी व्दारका सर्कल येथील वाहतुक कोंडीचा उपाय योजनाचे माँडेल सादर केले.

शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या व्दारका सर्कलवर होणारी वाहतुक कोंडी विविध उपाययोजना राबवून त्वरित सुधारण्याचे आदेशही त्यांनी दिले. काल सायंकाळी द्वारका सर्कलची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त वाहतुक मंगलसिंग सुर्यवंशी, प्रदिप जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे, विजय ढमाळ, भारत कुमार सुर्यवंशीसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दिलीप पाटील, एजाज मनियार, पंकज मोहावदे, फैजान खान, विवेक चव्हाण, प्रादेशिक परिवहन विभागाचे निरिक्षक विनोद साळी, मनपाचे विभागीय अधिकारी रविद्र धारणकर, एसटी महामंडळाचे वाहतुक निरिक्षक बी बी खैरनार आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!