Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आजपासून राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन

Share
आजआजपासून राज्यभर रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन Organizing road safety mission across the state from today

नाशिक । अजित देसाई

केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात आज ११ पासून दि. १७ जानेवारीपर्यंत रस्ता
सुरक्षा अभियान २०२० चे आयोजन करण्यात येणार आहे. मोटार वाहन अपघातांना परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार -प्रसार व्हावा या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. यांतर्गतपरिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकामविभाग, शालेय शिक्षण विभाग व इतर संबंधित संस्था व संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती व जनप्रबोधनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

केंद्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात ३१ वे रस्ते सुरक्षा अभियान साजरे करण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने रस्ता सुरक्षा अभियान २०२० करिता जिल्ह्यातील अंमलबजावणी व नियोजनाबाबत बैठक घेऊन संबंधिताना निर्देश द्यावेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन गृह (परिवहन) विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

या सुरक्षा अभियानात परिवहन विभाग तसेच पोलीस (वाहतूक) विभाग यांच्याद्वारे चौकसभा घेणे, बॅनर्स लावणे, माहितीपत्रके, हॅन्डबिल वाटप, वाहनचालकांची वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, अपघातातील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करणे तसेच शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वाहन चालकांचे प्रबोधन शिबीर घेणे, एस.टी वाहनातून रस्ते सुरक्षिततेसंदर्भात कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन आयोजित करणे, अपघातप्रवण वाहनचालकांसाठी समुपदेशन / सिम्युलेटर प्रशिक्षण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रवासी मार्गदर्शक बोर्ड लावणे, रस्ता दुरुस्तीचे ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना करणे , खड्डे दुरुस्ती, साईनबोर्ड व माहितीचे बोर्ड असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून ब्लॅक स्पॉट, झेब्रा क्रॉसिंग निश्चित करण्यासारखे उपक्रम राबवावेत अशी सूचना करण्यात आली आहे. .

महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात देखील रस्त्यांची दुरूस्ती व देखभाल करणे, पादचाऱ्यांकरिता सोयी-सुविधा, झेब्रा क्रॉसिंग, जनजागृती व चर्चासत्राचे आयोजन सप्ताहकाळात करण्यात येणार आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन, रस्ता सुरक्षा विषयाचा पाठ्यक्रमांत समावेश करणे, एनसीसी व एनएसएसच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, चित्रकला स्पर्धेचे आयोजन असे उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. आरोग्य विभागाकडून देखीलआपत्कालीन मदत पथके, वैद्यकिय शिबिरांचे आयोजन, गोल्डन अवर प्रथमोपचाराचे प्रशिक्षण हे उपक्रम राबवण्याला प्राधान्य देण्यात येणार
आहे.

सुरक्षित प्रवासासाठी प्रबोधन
वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन होऊ नये. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. म्हणून अपघात रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून लोकांना वाहन चालविताना तसेच रस्त्यावर चालत असताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे यासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यासाठी सुरक्षा अभियानात संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत

अपघातग्रस्तांवर उपचार महत्वाचे
अपघातावेळी घटनस्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे प्रथम प्राधान्य अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचविणे व त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे असले पाहिजे आणि अपघातग्रस्त व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांना तसे करण्यामध्ये कोणताही कायदेशीर अडथळा किंवा त्रास संभवत नाही या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास प्रसिध्दी देवून त्या माध्यमातून जनजागृती करावी तसेच १०८  क्रमांकाचा आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा वापर करण्यासाठी प्रबोधन करावे अशी
सूचना गृह ( परिवहन) विभागाकडून करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!