Saturday, May 11, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातून २७ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात

जिल्ह्यातून २७ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात

बांग्लादेश सीमेवरील निर्यात परवाना पेच सुटला; खा.डॉ.पवार यांची मध्यस्थी

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहिल्याने द्राक्ष हंगामाला उशिरा सुरुवात झाली.जानेवारीपासून द्राक्षनिर्यातीला चांगली सुरुवात झाली आहे.आतापासून जिल्ह्यातून २७ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

यावर्षी हंगामाच्या प्रारंभी निर्यातक्षम द्राक्षाला अवकाळी आणि लांबलेल्या पावसाचा फटका बसल्यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र, त्यानंतर सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा यामुळे आतापर्यंत या हंगामाने दुसरा टप्पा ओलांडला आहे.यामागील कारण म्हणजे द्राक्ष उत्पादकांच्या यशस्वी प्रयत्नांतून दर्जेदार द्राक्ष उत्पादनास निर्यातीचे आशादायक चित्र निर्माण झाले.

नेदरलँड, जर्मनी, युनायटेड किंगडम, रशिया,कॅनडा, चीन, डेन्मार्क, फिनलँड आदी देशांत द्राक्षाला अधिक मागणी होती.नाशिकची द्राक्षे युरोपीयन देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया आदी देशांत पाठविण्यात येतात.जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी टिकून राहण्यासाठी कृषी विभागाने द्राक्ष निर्यातीबाबत जनजागृती केली आहे तसेच निर्याती संबंधीचे निकष तपासून काटेकोरपणे कामकाज पार पाडले. नाशिकमध्ये यंत्र द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते त्यामुळे ३३००० शास्त्रीय व द्राक्षबागांचे निर्यातीसाठी नोंदणी झाली.

१५० कंटेनर बांग्लादेशला-खा.पवार

बांगलादेश सीमेवरील भारतीय द्राक्ष निर्यातीला आवश्यक परवान्यांचा अडसर खा.डॉ.भारती पवार यांच्या मध्यस्तीतून दूर झाला आहे.द्राक्ष निर्यातीचा पेच सुटल्याने व्यापारी व शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून सीमेवर थांबविण्यात आलेले जवळपास १०० ते १५० कंटेनर बांग्लादेशकडे रवाना झाले आहेत.

या प्रकरणी द्राक्षउत्पादक शेतकरी व व्यापारी वर्गाने खा.डॉ.भारती पवार यांयाशी संपर्क साधून निर्यातीला येणार्‍या अडचणी सांगितल्या नंतर त्यावर लगेचच तातडीने खा.डॉ.भारती पवार यांनी अपेडा व वाणिज्य विभागाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली व परवाना संबंधित त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या.या सूचनांची संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत निर्यातीस तातडीने परवानगी दिली.जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे सुमारे 8 कोटी रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचले.त्यामुळे शेतकर्‍यांनी व व्यापार्‍यांनी आनंद व्यक्त करून खा.डॉ.भारती पवार यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले. खासदार डॉ.भारती पवार ह्या शेतकर्‍यांच्या मदतीला धावून गेल्या व होणार्‍या संभावित नुकसानीतुन मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या