Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

विधानसभा २०१९ : आपट्यांच्या पानांद्वारे विजयी शुभेच्छा; दसर्‍यानिमित्त मतदारांशी हितगूज

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी प्रचाराला दसर्‍याचा मुहूर्त साधत मतदार संघातील गावात सीमोल्लंघन करीत दसर्‍याच्या विजयी शुभेच्छा स्वीकारल्या.
नाशिक शहरातील तीन मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार असून कोण कोणाला धडा शिकविणार? याचे उत्तर येत्या २४ तारखेला मिळणार आहे. मात्र, माघारीनंतर आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी दसरा सणांचा मुहूर्त साधत प्रचाराचा शुभारंभ केला.

जिल्ह्यातील आदिशक्ती-भगवती मातेच्या मंदिर परिसरात भाविक अर्थात मतदारांची होणारी गर्दी लक्षात घेता उमेदवारांनी मंदिरात थांबणे पसंत केले. याठिकाणी येणार्‍या मतदारांशी हितगूज करीत मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन उमेदवारांनी आज केले. शहर, उपनगर, खेड्यांतील ग्रामदैवत असलेल्या देवीच्या मंदिरात काही काळ जाऊन उमेदवारांनी विजयादशमीच्या निमित्ताने विजयी शुभेच्छा गोळा केल्या. याठिकाणी मतदारांना आपट्याची पाने वाटत आणि मिळणारा पाठिंबा लक्षात घेत उमेदवार-समर्थकांनी आपल्या विजयाचे गणित मांडण्यास प्रारंभ केला.

तसेच गेल्या नऊ दिवसापासून विविध ठिकाणी असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या दांडिया-गरबासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याठिकाणी असणारे नव मतदार युवक-युवतींशी आज अखेरच्या दिवशी उमेदवार व समर्थकांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या दांडिया-गरबा समारोपप्रसंगी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व उमेदवार यांनी भेटी देऊन कार्यकत्यांशी संपर्क साधला. अशाप्रकारे विजयीदशमीच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारांची पर्वणी साधली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!