Saturday, April 27, 2024
Homeनाशिकयुवा उर्जाद्वारे निराधारांना मदतीचा हात

युवा उर्जाद्वारे निराधारांना मदतीचा हात

सातपूर । प्रतिनिधी

गेल्या एक वर्षापासून युवा उर्जा फांउंडेशनचे माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मानवता हाच र्धम या उपक्रमांतर्गत समाजातील विविध घटकांना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

- Advertisement -

समाजातील सर्व समस्यां दुर झालेल्या नाहीत पण परंतू काही समस्यांचे निराकरण करणे गरजेचे असल्याने त्यासाठी युवा उर्जा फांउंडेशन प्रयत्नशिल आहे. सामाजिक कार्यात आपला कर्तृत्व म्हणुन युवा उर्जा फांउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्या पूढाकाराने समाजातील निराधार झालेल्या अथवा आई-वडीलांचा सांभाळ करण्यासाठी मुले नाहीत अशा दांपत्यासाठी, ज्या घरातील कर्ता पुरुष हयात नसलेल्यां वृध्दांसाठी उपजिविकेचे साधन म्हणुन दर महिन्याला धान्य उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात सूरूवात करण्यात आली.

नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य दिनकर पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ नागरिकांना धान्य वाटप करुन करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले. यावेळी नगरसेवक रवींद्र धिवर यांच्यासह उर्जा फांउंडेशनचे पदाधिकारी व युवक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या