Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरोजगार मेळाव्यात १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

रोजगार मेळाव्यात १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक व मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने रविवारी(दि.८) मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा संपन्न झाला.

- Advertisement -

यामध्ये १० नियोक्त्यांनी १२६ उमेदवारांची प्राथमिक निवड केली.यामध्ये २९३ रिक्तपदे उपलब्ध होती. याकरीता २५६ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या. या मेळाव्याचे उदघाटन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनिल सैंदाणे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम.कॉलेजचे प्रा.पवन सुदेवाड कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी संदिप गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन शुभदा पाठक यांनी केले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. पवन सुदेवाड व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच कौशल्य विकास विभागाचे अधिकारी शंकर जाधव, अख्तर तडवी, कर्मचारी बाळू जाधव, रावसाहेब गावित, महेंद्र महाले, कल्पना दवंगे, सागर भाबड, प्रदिप गावीत, अविनाश गायकर व सोनाली शिंदे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या