Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘नाशिक मध्य’ मधून चौरंगी लढत; प्रमुख पक्षांसह नऊ उमेदवार रिंगणात

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत सोमवारी झालेल्या माघारीनंतर सर्वत्र लढतीचे चित्र स्पष्ट झाले असुन नाशिक शहरातील नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात पाच प्रमुख राजकिय पक्षांसह एकुण नऊ उमेदवार उतरले आहे. मनसेना नंतर भाजप असा बदल झालेल्या मतदार संघात आता चौरंगी लढत होणार आहे. यात कॉग्रेस पक्षांसंदर्भातील उलटसुलट चर्चेला विराम मिळाला असुन कॉग्रेसने ही जागा लढविण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थित शहरातील चार मतदार संघातील उमेदवारांची माघारीची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यानंतर लगेत मतदार संघात शिल्लक राहिलेल्या अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यातील नाशिक मध्य मतदार संघात नऊ उमेदवार शिल्लक राहिले आहे. यात विद्यमान आ. देवयानी फरांदे (भाजपा – सेना युती), नितीन भोसले (मनसेना), डॉ. हेमलता पाटील (इंडियन नॅशनल कॉग्रेस) व संजय साबळे (वंचित बहुजन आघाडी) अशा उमेदवारांत आता चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच याठिकाणी मैदानात दिपक डोके (बसपा),कपिल वाघ (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया), अजिज अब्बास पठाण, प्रकाश कनोजे व देविदास सरकटे (अपक्ष) असे उमेदवार मैदानात उतरले आहे.

या मतदार संघात सन २००९ मध्ये मनसेनेचे वसंत गिते आणि सन २०१४ मध्ये आ. देवयानी फरांदे या विजयी झाल्या होत्या. गत निवडणुकीत फरांदे यांनी गिते यांचा पराभव केला, यावेळी कॉग्रेसचे शाहु खैरे यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. यात गिते यांनी नंतर भाजपात प्रवेश केल्याने आता त्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न अयशस्वी झाले.

गत निवडणुकीत कॉग्रेसला तिसर्‍या नंबरची मते मिळाल्याने याठिकाणी विजयाच्या आशा होत्या. यानुसार आता पुन्हा कॉग्रेसने खैरे यांना उमेदवारीजाहीर केली. मात्र त्यांनी मनसेनेचे भोसले यांच्याशी असलेले नातेसंबंध लक्षात घेत उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे कॉग्रेस पक्षाने डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली असुन पक्षाने निर्धाराने जागा लढण्याची तयारी केली आहे.

वंचित कडुन साबळे यांनी रणशिंग फुंकले आहे. साबळे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती असुन मोठा राजवाडा परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांनी जय्यत तयारी केली आहे. अशाप्रकारे याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. याठिकाणी मनसेनेला काही राजकिय पक्षांकडुन छुपी मदत होणार असल्याची चर्चा असली तरी यातील वास्तव येत्या २४ आक्टोंबरला समोर येणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!