जि. प. सीईओ कारभाराविरोधात सदस्य एकवटले; आज स्थायी समिती बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता

जि. प. सीईओ  कारभाराविरोधात सदस्य एकवटले; आज स्थायी समिती बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात पदाधिकार्‍यांसह सदस्यांमध्ये खदखद सुरू झाली आहे.पदाधिकारी असो की, सदस्य सामान्य कामे होत नाहीत, फायली प्रलंबित ठेवल्या जातात, फायलींवर चर्चेचा शेरा देऊन अडवणूक केली जात आहे, असे आरोप सदस्यांकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे भुवनेश्वरी यांच्या कारभाराविरोधात सदस्यांनी एकत्र येत, विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याची तयारी केल्याची चर्चा जि. प. वर्तुळात आहे.

गुरुवारी(दि. ५) स्थायी समितीची मासिक बैठक होत असून याचे पडसाद शक्यता आहे. यासंदर्भात एका पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. ३) सर्व गटनेते, प्रमुख सदस्यांची बैठक झाली. बैठकीत, सदस्यांनी पदाधिकार्‍यांकडे कामे होत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर पदाधिकारी यांनी आमचीच कामे होत नसल्याची व्यथा मांडली. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्याकडे कामांसाठी गेल्यानंतर त्या हो म्हणतात मात्र कामे होत नाहीत. फायलींसंदर्भात भेटी असता, लवकर फाईल काढणार असल्याचे सांगतात अन् दुसरीकडे फाईलवर पानभर शेरा मारून ठेवतात. पदाधिकारी व सदस्य हे सार्वजनिक कामांसाठी गेले असता, त्यात पदाधिकारी, सदस्यांचे हितसंबंध असल्याचा संशय घेत ती कामे करत नसल्याचे यावेळी सदस्यांनी सांगितले.

निधी वेळेत खर्च व्हावा, यासाठी आतापर्यंत अनेकदा सूचना करण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होत पदाधिकार्‍यांनी सांगितले. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत निधी खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले, त्यावरही कार्यवाही सुरू आहे, निधी खर्च होईल असे सांगत आमची बोळवण करत असल्याचे सदस्यांनी सांगितले. अध्यक्षांनी निधी खर्चाबाबत बैठक घेऊन निधी खर्चाच्या सूचना केल्या, असे असतानाही निधीच्या फाईली काढलेल्या नाहीत. विभागप्रमुखांच्या बैठका घेऊन नेमकी कोणती कार्यवाही करतात, असा सदस्यांनी यावेळी उपस्थित केला. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करून कार्यवाही होणार नसेल तर, कशाला बैठका घेतात, असा संतप्त सवाल सदस्यांनी केला आहे. विकासकामांची अडवणूक करत असल्याचा आरोपही सदस्यांंकडून होत आहे.

विभागीय आयुक्तांची घेणार भेट
भुवनेश्वरी एस. यांच्या या कारभाराविरोधात विभागीय अधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे कळते. दोन दिवसांत सर्वपक्षीय सदस्यांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांकडे जाणार असल्याचे वृत्त आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com