Friday, April 26, 2024
Homeनाशिककांदा साठवणुकीची होणार तपासणी; जिल्हाधिकार्‍यांचे आढावा बैठीत आदेश

कांदा साठवणुकीची होणार तपासणी; जिल्हाधिकार्‍यांचे आढावा बैठीत आदेश

नाशिक । प्रतिनिधी

कांदयाच्या चढत्या भावांमुळे हैराण झालेल्या जिल्हा प्रशासनाने याचा आढा घेत किरकोळ आणि घाउक व्यापार्‍यांना दररोज खरेदी आणि विकलेल्या कांद्याच्या साठयाबाबत माहीती देण्याचे तसेच तहसिलदारांना व्यापार्‍यांकडील कांदा साठवणुकीची तपासणी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी आज दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या उपस्थितीत कांद्याच्या दरवाढीबाबत एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती.जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने,पणन मंडळाचे नाशिक विभागाचे व्यवस्थापक बी.सी. देशमुख जिल्हा कृषी अधिक्षक संजीव पडवळ,मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापक दिलीप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसगीकर उपस्थित होते.

अवकाळी पावसाने जिल्हयातील ८० टक्के कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या बाजारभावाने सरासरी आठ हजारांचा टप्पा पार करत उच्चांक गाठला आहे. सध्या बाजार समितीत दररोज साधारणपणे २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. तर ७ हजार ८०० रूपये सरासरी दर मिळत असल्याचे यावेळी अधिकार्यांनी सांगितले. गतवर्षी म्हणजे २०१८ मध्ये आजअखेर १८ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली

मात्र यंदा आजच्या तारखेपर्यंत अवघ्या ७ लाख ५२ हजार क्विंटल म्हणजेच ४० टक्केच कांदा आवक होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याचे या आढावा बैठकीतून समोर आले आहे. ऑक्टोबर मध्ये झालेल्या अवकाळी पाउस आणि त्यानंतर आलेल्या ‘क्यार’, ‘महा’ वादळाने लाल कांदा पिकाचे राज्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाल कांद्याची आवक मंदावली.

अल्प प्रमाणात राहीलेल्या उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात आल्याने परिणामी कांदादराने आठ हजाराचा टप्पा पार केला. मागील दोन दिवसांत तर कांदादराने १३ हजाराचा दर मिळाला.खरिपात शेतकर्यांनी लागवड केलेला तब्बल ५८ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाचा लाल कांद्याचे नुकसान झाले. परिणामी कांदा दराने शंभरी पार केली. रोजच्या जेवणातून आणि हॉटेलमधून कांदा हददपार झाला आहे.

मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी किरकोळ आणि घाउक व्यापार्यांसाठी कांदा साठवण मर्यादा कमी केली आहे. असल्याचे अधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.

शासनाला पाठवणार अहवाल
किरकोळ बाजारपेठेत कांदा दराने शंभरी पार केल्याने केंद्राने ही बाब गांभीर्याने घेत कांद्याचा पुरेसा बफर स्टॉक करून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकूणच कांद्याचे वाढते दर लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी आज कांद्याची उपलब्धता आणि दराबाबत आढावा बैठक घेतली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्केच कांद्याची आवक झाल्याचे या बैठकीतून समोर आले. याबाबतचा शासनाला अहवाल सादर करणार असल्याचे जिल्हाधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या