Type to search

Featured maharashtra नाशिक

नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांद्वारे महाराष्ट्रात 9 हजार 300 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी   नवीकरणीय ऊर्जेच्या विविध स्त्रोतांद्वारे डिसेंबर 2018 पर्यंत देशभरात 74.79 गीगा वॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित करण्यात आली असून महाराष्ट्रात 9 हजार 300. 18 मेगा वॅट वीज निर्मीती क्षमता स्थापित करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने वर्ष 2018-19 (5 फेब्रुवारी 2019) पर्यंत राज्यांना नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मिती स्थापित करण्यासाठी केंद्रीय सहायता निधीतून 3 हजार 584 कोटी 8 लाखांचा निधी प्रदान केला.

या माध्यमातून देशात डिसेंबर 2018 पर्यंत सौर ऊर्जेच्या माध्यमातून 25.21 गीगा वॅट , पवन ऊर्जेच्या माध्यमातून 35.14 गीगा वॅट, जैविक ऊर्जेद्वारे 9.92 गीगा वॅट  आणि लघु जल ऊर्जेद्वारे 4.52 गीगा वॅट अशा एकूण 74.79 वीज  निर्मिती क्षमता स्थापित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 9 हजार 300. 18 मेगा वॅट वीज निर्मीती क्षमता

महाराष्ट्रात डिसेंबर 2018 पर्यंत सौर ऊर्जेच्या माध्यमातून 1607.79 मेगा वॅट , पवन ऊर्जेच्या माध्यमातून 4788.13 मेगा वॅट, जैविक ऊर्जेद्वारे 2528.69 मेगा वॅट आणि लघु जल ऊर्जेद्वारे 375.570 मेगा वॅट अशा एकूण  9 हजार 300. 18 मेगा वॅट वीज निर्मीती क्षमता स्थापित  झाली आहे.

केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा तथा ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)आर.के.सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!