Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नांदगाव येथे आज ‘देशदूत’ आरोग्य महोत्सव; नामको, नवजीवन हॉस्पिटलचे सहकार्य

Share

नाशिक ।  प्रतिनिधी

नाशिकच्या मातीतून अंकुरलेले एकमेव वृत्तपत्र दैनिक ‘देशदूत’ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्य महोत्सव अभियान सुरू झाले आहे. उद्या (दि.३०) रोजी नांदगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य महोत्सव होणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपणार्‍या ‘देशदूत’ने सुवर्ण महोत्सवानिमित्त जिल्हाभरात वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. कितीही प्रगती झाली असली तरी आजही महिलांचे आरोग्य हा दुर्लक्षित विषय आहे. ग्रामीण भागात तर हे भीषण वास्तव आहे. महिला आरोग्याची निकड लक्षात घेता ‘देशदूत’ने आरोग्य महोत्सवाचा उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्ह्यातील २० ठिकाणी महिलांसाठी आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नामांकित नामको हॉस्पिटल व डॉ. लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स विद्यार्थिनी व महिलांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून मौलिक मार्गदर्शन करतील. उंची, वजन, रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय, गर्भाशय, मुखाचा कॅन्सर या तपासण्या महोत्सवात केल्या जाणार आहेत. सुरक्षित मातृत्व व मूल होत नसणार्‍यांना नवजीवन हॉस्पिटलचे तज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत. डॉ. लाड यांचा सल्ला व तपासणी नि:संतान दाम्पत्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.

सुवर्ण महोत्सवानिमित्त मार्च २०२० अखेरपर्यंत देशदूत जिल्ह्यातील २० ठिकाणी हा आरोग्य महोत्सव घेत आहे. नांदगाव येथील आरोग्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.श्रेया देवचके, एकात्मिक बाल विकास अधिकारी विजय झाल्टे, नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील गरजुंनी आरोग्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बचत गटांची जत्रा
आरोग्य महोत्सवाच्या ठिकाणीच बचत गटांची जत्राही आयोजित केली आहे. तालुक्यातील बचत गटांना यानिमित्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीही केली जाणार आहे.

सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन
सामाजिक भान जपत देशदूततर्फे कला, वाणिज्य व महिला महाविद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट देण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!