देवळालीत चंदनचोर जेरबंद

0
दे. कॅम्प | वार्ताहर येथील लष्करी हॉस्पिटल जवळील मिस्त्री मार्गावर जेसीओ क्लबच्या आवारातून डिसेंबर महिन्यात ४ चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती.
या चोरीतील चंदनाच्या लाकडांसह २ संशयित, २ मोटार सायकल असा एकूण ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल देवळाली कॅम्प पोलिसांनी पाथर्डी गावाजवळील झोपडपट्टी येथून हस्तगत केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फिर्यादी आप्पाराव लोभाजी पवार यांनी दि. ५ डिसेंबर रोजी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीदाराच्या माध्यमातून पाथर्डी येथील झोपडपट्टीनजीक चंदनाचे झाडे पडलेले असल्याचे समजले.
त्यानुसार देवळाली पोलिसांतील पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव, पोलिस शिपाई पंढरीनाथ आहेर, सुभाष जाधव, संजय बोराडे, सुदाम झाडे, सचिन गावले आदींच्या पथकांनी वपोनि अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
संशयित म्हसू मछिंद्र जाधव (२३) रा. पाथर्डी गाव झोपडपट्टी व सुरेश लक्ष्मण शिंदे (३०) रा. कजेसांगवी ता. चांदवड या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी याबाबत दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरटे गजाआड झाले आहेत.

LEAVE A REPLY

*