Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

औैद्योगिक वसाहतीच्या समस्या सोडवण्यावर भर : भामरे

Share

सातपूर । प्रतिनिधी

औद्यागिक वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी भर दिला जाणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी स्पष्ट केले.जिल्हा उद्योग मित्र सभेत ठरल्याप्राणे औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न सोडवण्याकरिता आयामा मध्ये बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यासोबतच उपाय योजना करण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी आयमाचे अध्यक्ष वरून तलवार म्हणाले कि जिल्हा उद्योग मित्र सभेत ठरल्याप्रमाणे आजच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले मागील  १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये ड्रेनेज चा मुख्य प्रश्न आहे.त्यासोबतच े अलॉटमेंट न करण्यात आलेल्या मोकळ्या भूखंडाना कम्पाऊंड करणे, प्रामुख्याने झोपड्पट्टीजवळील एच सेक्टर मधील मोकळ्या भूखंडावर कम्पाऊंड करावे. अग्नीशमन केंद्रासाठी सिमेन्स एक्सलो पॉईंट महेंद्र उजाईंन सिम्बॉयसिस कॉर्नर आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. व तातडीने सेवा देण्याच्या दृष्यीने पंक्चर देण्याची मागणी करण्यात आली.

नैसर्गिक नाले बंद करण्यात आल्यामुळे उद्योगांच्या आवारात पाणी तुंबते व उद्योगांचे नुकसान होते त्यासाठी पाहणी करणे व पानी जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात यावी व ज्या औद्योगिक विभागात या प्रकारच्या समस्या असतील तेथे दोन्ही बाजूला चेंबर करण्यात यावेत असे ठरले . तसेच डी २४ सेकटर मधील दिलीप कोच कंपनी परिसरात जेथे पाणी तुंबते त्या पाण्यास कायमस्वरूपी वाट मोकळी करून देण्याचे निश्चित करण्यात आले.

रस्त्याची डागडुजी, साइड पट्टी महानगरपालिका कडे देणे, ड्रेनेज लाईन साठी डीपीआर एमआयडीसी ला बनवायला सांगणे, नवीन अंबड औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न सोडवणे इत्यादी विषयावर चर्चा झाली.  आयमा रिक्रिएशन सेंटर येथे आयोजित बैठकीत व्यवस्थापक अतुल दवंगे, एमआयडीसीचे अधिकारी शशिकांत पाटील, एस बी चावर्कर, नाशिक महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे, श्री बच्छाव, अंबडचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीपाद परोपकारी, आयामाचे अध्यक्ष वरूण तलवार, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, सचिव योगिता आहेर राजेंद्र पानसरे, तक्रार समितीचे विनायक मोरे, दिलीप वाघ आदी होते .

यावेळी आयामांचे प्रमोद वाघ, विकास माथूर, जगदीश पाटील, अविनाश बोडके, विजय जोशी, जयंत पगार, राहुल गांगुर्डे, सुजीत भोर, जयदीप अलिमचंदानी, गोविन्द झा, प्रकाश ब्रह्माणकर, अनिल डिंगरे, जितेंद्र आहेर, कुंदन दारंगे आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!