Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सरसंघचालकांची वनवासी कल्याण प्रांत कार्यालयास भेट; ज्येष्ठ प्रचारक दीक्षितांच्या प्रकृतीची विचारपूस

Share

सातपूर । प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रांत कार्यालयास भेट देऊन कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दीक्षित यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सरसंघचालकांच्या नाशिक शहरातील विविध बैठका व महत्त्वपूर्ण भेटींना आज सकाळपासून प्रारंभ झाला.

बाळासाहेब दीक्षित (वय ९२) संघाचे ज्येष्ठ प्रचारक असून ६५ पेक्षा अधिक वर्षांपासून ते संघ प्रचारक या नात्याने कार्यरत आहेत. १९७८ साली महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य प्रारंभ झाल्यानंतर या कार्याची सुरुवात व महाराष्ट्रात या कार्याचा विस्तार करण्यात बाळासाहेब दीक्षित यांचे योगदान मोठे मानले जाते. यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सरसंघचालक आज कल्याण वनवासीआश्रमाच्या कार्यालयात आले होते

.बाळासाहेब दीक्षित यांच्या खोलीत दाखल झाल्यानंतर डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत आस्थेने त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या खोलीतील टेबलवरील विविध पुस्तके पाहून, या वयातील बाळासाहेबांचे अफाट वाचन पाहून डॉ. भागवत यांनी आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेबांनीच सरसंघचालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. दहा मिनिटे सरसंघचालक डॉ. भागवत यांनी बाळासाहेबांशी हितगूज साधले. त्यानंतर सरसंघचालकांनी कार्यालयात आलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या विविध कार्यकर्त्यांचा परिचय करून घेतला व त्यांच्यासमवेत चहापान घेतले.

यावेळी डॉ. भागवत यांच्यासमवेत संघाचे प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे, रोहित रिसबूड तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत सचिव शरद शेळके, क्षेत्र संघटन मंत्री संजय कुलकर्णी, डॉ. बाबुलाल अग्रवाल, प्रा. काका देशमुख, किशोर सूर्यवंशी, संजय शहा, प्रशांत पाटील यांच्यासह वनवासी कल्याण आश्रम व संघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकर्‍यांशी संवाद
डॉ. मोहन भागवत यांनी सातपूर येथील शेतकर्‍यांशी संवाद साधत संघाच्या ध्येय धोरणांना तळागळातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला. येथील राज्य कर्मचारी वसाहतीत असलेल्या सुधाकर भंदुरे यांच्या अंकुर या बंगल्यामध्ये ही बैठक झाली. या बैठकीला जिल्हाभरातील २० शेतकरी बांधव उपस्थित होते. यात प्रामुख्याने शेती उद्योग करणारे प्रगतीशील शेतकरी, शेती व्यवसायासोबतच पूरक व्यवसाय करणारे शेतकरी, प्रयोगशील शेतकर्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यात बहुतांश शेतकरी हे आरएसएस स्वयंसेवक होते. या बैठकीत धोरणे व कार्यप्रणालीची माहिती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून त्यांना या चळवळीत सहभागी करण्याच्या दृष्टीने डॉ. भागवत यांनी प्रबोधन केले.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!