Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

केंद्रीय पथकाकडून आज नुकसानीची पाहणी; निफाड, चांंदवड, मालेगावला भेट

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात व जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेत पिंकांचे अतोनात नुकसान झाले असून केंद्रीय पथक या नुकसानीचा आढावा घेणार आहे. ंकेंद्रीय पथक गुरुवारी नाशिकमध्ये दाखल झाले. शुक्रवारी (दि.२२) हे पथक निफाड, चांदवड व मालेगाव या तालुक्यांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीपैकी जिल्ह्याला १८१ कोटींचे अनुदान पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहे.

परतीच्या पावसाने द्राक्षबागांसह मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कडधान्ये, कांदा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्ह्यात यंदा साडेसात लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्यापैकी ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. शासनाने शेती पिकांसाठी ८ हजार प्रति हेक्टरी, तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची घोषणा केली आहे.

नुकसान भरपाईसाठी जिल्ह्यासाठी एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ हजार रुपयांचा मदत निधी अपेक्षित होता.परंतु १८१ कोटींचीच मदत शासनाने दिली आहे. त्यामुळे शासनाने तोंडाला पाने पुसल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये आहे. या संंकटात केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

उशिराने का होईना केंद्रीय पथक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. शुक्रवारी निफाड, चांंदवड, मालेगाव या तालुक्यांना ते भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेणार आहे. तत्पूर्वी ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन माहिती घेतील. शासनाने दिलेली मदत तुटपुंजी असल्याने केंद्रीय पथकाकडे शेतकर्‍यांचे डोळे लागून आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!