Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

१४६ उमेदवारांनी सादर केला निवडणूक खर्च

Share

नाशिक । दि.21 प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत किती खर्च केला याची माहिती उमेदवारांनी निवडणूक शाखेला देणे बंधनकारक आहे. शनिवार (दि.२३) खर्च करण्याची अंतिम मुदत असून जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत निवडणूक लढविलेल्या १४८ पैकी १४६ उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. नाशिक पूर्व व नांदगाव मतदारसंघातील प्रत्येकी एका उमेदवारांने अद्याप खर्च सादर केलेला नाही.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास २६ दिवस लोटले आहे. राज्यात २१ ऑक्टोबरला निवडणूक आणि २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. मात्र, अद्याप राज्यात सत्ता स्थापनेचे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी प्रचारासाठी केलेला खर्च आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार खर्च सादरीकरणाची मुदत शनिवारी संपुष्टात येत आहे.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे हा खर्च सादर करणे गरजेचे असून त्यासाठी उमेदवारांची खर्च निरीक्षकांनी बैठक घेत माहिती दिली आहे. 9 कॉलमप्रमाणे कसा खर्च सादर करावयाचा याचीही सविस्तर माहिती दिली होती. तसेच मंगळवारी याबाबत पुन्हा खर्च निरीक्षकाच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयात बैठकही झाली. त्यानुसार जिल्ह्यातील १५ पैकी १३ विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी खर्चही सादर केला आहे. नांदगाव आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघातील प्रत्येकी एक उमेदवाराचा खर्च सादर झालेला नाही. खर्चाचा अहवाल प्राप्त झाल्यनांतर जिल्हाधिकारी त्याची तपासणी करून लागलीच आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तो सादर केला जाणार आहे.

ही माहिती सादर करावी लागेल
निवडणुकीसाठी २६ लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. प्रचारासाठी मेळावे व सभेसाठी केलेला खर्च, स्टार प्रचारकांचा खर्च, प्रचार कार्यालय, फलक, जाहिरात, ब्लक एसएमएस व माध्यमांमध्ये केलेला खर्चाची माहिती द्यावी लागेल. तसेच, प्रचारासाठी वाहन खर्च, कार्यालयाचा दैनंदिन खर्च, पक्षाकडून प्रचारासाठी मिळालेला निधी, जनतेने दिलेली वर्गणी आदी खर्चाची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!