Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

संदर्भ रुग्णालयाचा अजब कारभार; रुग्णांना खाजगी रुग्णालयाचे ‘व्हिजिटींग कार्ड’

Share

जुने नाशिक । प्रतिनिधी

विभागीय संदर्भ रुग्णालयात पाहीजे त्या संख्येने बेड व तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी येणार्‍या रुग्णांना बेड रिकामे नसल्याचे कारण सांगत थेट खासगी रुग्णालयाचे व्हिजिंट कार्डच देण्यात येत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काल  सकाळी जुने नाशिक येथील बागवानपुर्‍यातील रहिवाशी शेख मुमताज शफी (७०) या महिलेला किडनीचा विकार होता, म्हणून विभागीय संदर्भ रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यांना तपासायला कोणीही डॉक्टर आले नाही. काही वेळाने डॉक्टर आले पण त्यांना या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णला माझ्या दवाखान्यात आणा असा सल्ला देत थेट व्हिजिटींग कार्ड रुग्णाच्या मुलाच्या हातात दिले. डॉ. वाघुर्दे यांचे कार्ड त्यांच्या मुलाकडे होते.

शेखसह इतरही काही रुग्णांना कार्ड वाटप करुन खासगी रुग्णालयात येण्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या ठिकाणी कॅन्सर, किडनी विकार अशा मोठ्या आजारांवर उपचार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र ी मागणीच्या तुलनेत अगदी कमी संख्येने बेड उपलब्ध राहतात. येथील काही विभाग तर बंद पडलेले आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील रुग्णांना मोठा फटका बसत आहे. कारण बाहेरुन रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आल्यावर यत्यांना बेड मिळत नाही. तर दुसरीकडे तज्ज्ञ डॉक्टर देखील नियमित उपलब्ध राहत नाही.

अशा वेळी बाहेर गावाहून येणार्‍या रुग्णांना इतर खासगी रुग्णालयात पाठविण्यात येते. गरीब, गरजुंना येथून फायदा मिळावा म्हणून शासनाने भव्य रुग्णालय उभारले खरे, मात्र त्याचा लाभ न मिळता उलट सामान्यांना फटका बसत आहे. याबाबत त्वरीत शासनाने दखल घ्यावी, या ठिकाणी बेड संख्या व डॉक्टर संख्या वाढविण्यात यावी तसेच दोषींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दोन बेड होते रिकामे

बेड रिकामे नसल्याचे कारण देत खासगी रुग्णालयाचे कार्ड मिळाले, मात्र मी वरती जाऊन पाहीले तर दोन बेड रिकामे होते. याबाबत विचारणा करुन देखील योग्य उत्तर न मिळाल्याने आईला घेऊन गंजमाळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. शासकीय दवाखान्यात लोकांना सेवा मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग.
– मुकीम शेख, रुग्णाचा मुलगा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!