Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

खोट्या सभ्यतेचा बुरखा फाडणारे ‘वारूळ’; राज्य नाट्य स्पर्धेत आर. एम. ग्रुप, नाशिकचे सादरीकरण

Share

नाशिक । प्रतिनिधी

समाजात सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणार्‍या तथाकथित सुशिक्षित समाजाचा खरा वास्तव चेहरा लोकांसमोर आणणारे आणि अशा वृत्तीचा अंतिमतः कसा नायनाट होतो हे दाखवून देणारे ‘वारूळ’ हे नाटक चांगलेच गाजले.

आर. एम. ग्रुप,नाशिक च्या वतीने परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक सादर झाले. समाजात अनेक जण वरवर सभ्यतेचा आव आणत असतात मात्र अशा लोकांचे खरे रूप वेगळेच असते. मात्र कधी ना कधी त्यांचे खरे रूप जगासमोर येते आणि अशा उच्चभ्रू वर्गाचा बुरखा पांघरणार्‍या घटकांचा कशा पद्धतीने नाश केला जातो हेच चित्रण ‘वारूळ’ या नाटकाच्या माध्यमातून दाखवण्यात आले. अशा लोकांचे खरे व वास्तव रूप लोकांसमोर आणणार्‍या दोन व्यक्तिरेखांचा संवाद या नाटकात आहे.

श्रीमंतांचा खोट्या वागण्याचा गरीबांना कसा फटका बसतो व त्या वृत्तीचा कथेतील नायक कसा पर्दाफाश करतात हे या प्रयोगातून दिसून आले. त्याबरोबरच नव्या युगातील स्त्री तिच्यावर अन्याय झाल्यास स्वस्थ बसणारी नाही. ती कोणत्याही मार्गाने व कोणत्याही रूपात विकृत पुरुषी प्रवृत्तीला धडा शिकवू शकते असाही एक प्रत्यय या नाटकाच्या निमित्ताने आला. नाटकाचे लेखन राजेंद्र पोळ यांचे तर दिग्दर्शन विक्रम गवांदे यांनी केले आहे.

नाटकात विक्रम गंवादे, स्वराली गर्गे व विवेक महाजन या कलाकारांनी भूमिका साकारल्या. प्रकाशयोजना विलास चव्हाण व रवी रहाणे यांची होती. विक्रम गंवादे व मोहन ठाकरे यांनी नैपथ्य केले. अंकिता मुसळे व धृवकुमार तेजाळे यांनी नाटकाला संगीत दिले. रंगभूषा व वेषभूषा शशी भरत, दीपिका मारू व अपूर्वा ज्योत्स्ना यांनी केली. सुधाकर अमृतकर, संतोष झेंडे, शेखर जाधव, सुनील तांबे यांनी सहायक म्हणून काम पाहिले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!