Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘घुमर’ला मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख; ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होणार

Share

नाशिक । प्रतिनिधी 

राजस्थानमधील पारंपरिक आणि प्रसिद्ध लोकनृत्यांपैकी एक असलेल्या ‘घुमर’ नृत्य रविवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळवून विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे.  या कार्यक्रमात तब्बल पाच हजाराहून अधिक महिला सहभागी होणार असून या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होण्याची शक्यता आहे.

सदर कार्यक्रम राजस्थानमध्ये व्हीआयपी फाऊंडेशन, हेल्प इंडिया ऑनलाईन आणि अखिल भारतीय मारवाडी युवा मंच या पुढाकाराने तीज, उत्सव, गणगौर आणि वैवाहिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांमध्ये अत्यंत लोकप्रिय घुमर नृत्यास एक नवीन ओळख देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या कार्यक्रमाशी संबंधित डॉ. पवन परिक म्हणाले की, १७ नोव्हेंबरचा दिवस राजस्थानच्या घुमर नृत्यासाठी एक नवीन विक्रम निर्माण करेल. कारण हे नृत्य गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भव्यतेसह आपली उपस्थिती जाणवेल. नाशिक तपोवन परिसरातील साधुग्राम येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत या घुमर नृत्याचे भव्य सादरीकरण होईल.

डॉ. पारीक यांनी सांगितले की, कार्यक्रमास पाहुणे म्हणून व्हीआयपी फाऊंडेशनचे संस्थापक-संयोजक सुशील ओझा, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. एन. श्रीमाली, दिनेश गिल, जगदीश पारीक हे उपस्थित राहतील, तर मिस इंडिया इंटरनॅशनल २०१९ अनन्या शिंदे, अभिनेता आर्यन माहेश्वरी आणि देशातील विविध क्षेत्रातील प्रख्यात सेलिब्रिटीही यात सहभागी होतील.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!