Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लाचखोरांना पकडण्यात नाशिक राज्यात तिसरे; वर्षभरात १३२ लाचखोर जाळ्यात

Share

नाशिक । खंडू जगताप

लाचखोरांना पकडण्यात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मागील वर्षांच्या तुलनेत प्रगती साधत सहाव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानी झेप घेतली आहे. चालू वर्षी १०४ सापळे रचत १३२ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले. अपसंपदेचे तीन तर अन्य एका भ्रष्टाचाराचा असे 108 गुन्हे एसीबीच्या नाशिक विभागात नोंदवण्यात आले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यात १७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

राज्यात पुणे विभागात सर्वाधिक १५१ सापळे रचून प्रथत क्रमांकावर आहे तर दुसर्‍या क्रमाकांवर औरंगाबादचा (१०८) क्रमांक येतो. तर १०४ सापळ्यांसह नाशिक तिसर्‍या स्थानी आहे. अमरावती चौथ्या (९८) क्रमांकावर आहे. मागील दोन वर्षात नाशिक दुसर्‍या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर खाली घसरला होता. परंतु नव्याने आलेले अधीक्षक सुनील कडासने व त्यांच्या पथकांनी ७ महिन्याच्या कालावधीत चांगली कामगिरी केली.

नाशिक विभागात पाचही जिल्ह्यात २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सापळा लावण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढंले आहे. जिल्ह्यात २०१८ मध्ये ऑक्टोंबर पर्यंत अवघे ८९ सापळे यशस्वी झाले होते. वर्षभरात ११५ सापळे लावण्यात आले होते. तर अपसंपदेचा ७ गुन्हे दाखल होते. २०१९ सापळ्यांची संख्या १०४ झाली असून, अपसंपदेचे ३ व अन्य एक गुन्हा दाखल आहे.

विभागात जळगाव जिल्हा अव्वल असून, गत वर्षी दाखल २२ सापळ्यांची संख्या यंदा २७ झाली आहे. २०१९ मध्ये येथे अपसंपदेचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात २०१८ मध्ये १९ सापळे लावण्यात आले होते. तर अपसंपदेचा एक गुन्हा दाखल होता. २०१९ सापळ्यांची संख्या २४ झाली असून, अपसंपदेचा अद्यापपर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

अहमदनगर जिल्ह्यात २०१८ मध्ये २० सापळे लावण्यात आले होते. अपसंपदेचे दोन तर अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा दाखल होता. २०१९ मध्ये सापळ्यांची संख्या २५ झाली. नंदुरबारमध्ये दोन्ही वर्षांमध्ये आठ ही सापळ्यांची संख्या कायम राहिली असून, २०१८ मध्ये येथे अपसंदेचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

धुळे जिल्ह्यात गत वर्षी १४ सापळे तर दोन अपसंदेचे गुन्हे दाखल होते. २०१९ मध्ये या जिल्ह्यात सापळ्यांची संख्या १६ झाली असून, भ्रष्टाचाराप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक विभागात २०१८ एकून ८३ सापळे यशस्वी ठरले होते. याशिवाय अपसंपदेचे सात तर अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा दाखल होता. 2019 मध्ये सापळ्यांची संख्या शंभर इतकी झाली असून, अपसंपदेचे तीन तर अन्य भ्रष्टाचाराचा एक गुन्हा दाखल आहे.

अधिकार्‍यांचा चांगला समन्वय
नाशिक विभागातील एसीबीच्या सर्व जिल्ह्यांमधील अधिकार्‍यांचा समन्वय चांगला असून. भ्रष्टाचाराबाबत चांगली जनजागृती आम्ही घडवून आणली आहे. परिणामी नागरिक तक्रारीसाठी पुढे येऊ लागले आहे. वर्षाअखेरपर्यंत अधिक चांगले काम नाशिककरांना दिसेल.
– सुनील कडासने, अधीक्षक एसीबी नाशिक विभाग

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!