Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

२२ ला महापौर – उपमहापौर निवडणूक; आजपासून अर्जाचे वितरण; २० रोजी अर्ज दाखल होणार

Share
पोटनिवडणुकीसाठी मनपा यंत्रणा सज्ज; NMC by-electon

नाशिक । प्रतिनिधी

शासनाच्या नगरविकास विभागाकडून २२ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अध्ंयादेशात तीन महिन्यांच्या आत म्हणजे २२ नोव्हेंबर २०१९ च्या आत महांपौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज महापालिका नगरसचिव विभागाकडुन महापौर – उपमहापौर निवडणूक येत्या २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्याचे जाहीर करीत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

यातच नाशिक महापालिकेच्या विद्यमान महापौर रंजना भानसी यांचा वाढवून दिलेला कालावधी देखील संपत आला आहे. या अध्यादेशानुसार महापालिका नगरसचिव विभागाने तातडीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्यासोबत चर्चा केली. यात विभागीय आयुक्तांनी महापौर – उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी येत्या २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिका सभागृहात विशेष महासभा बोलविली आहे.

या निवडणुकीच्या सभेसाठी पिठासन अधिकारी म्हणुन विभागीय आयुक्त माने यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची नियुक्ती केली आहे. या आशयाचे पत्र महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले आहे. हा निवडणुक कार्यक्रम सात दिवस अगोदर जाहीर करावा लागत असल्याने महापालिका प्रशासनाकडुन तयारी सुरू झाली आहे.

महापौर निवडणुक कार्यक्रम
आज  (दि.१६)पासुन या दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्जाचे वितरण सुरू होणार आहे. तर दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यत या वेळेत उमेदवारी अर्जाची स्विकृती नगरसचिव राजु कुटे यांच्या कार्यालयात होणार आहे. तर निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबरच्या विशेष महासभा सकाळी ११ वाजता पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मांढरे हे सभेच्या प्रारंभी अर्जांची छाननी करणार असुन त्यांनंतर अर्ज माघारीसाठी ठराविक वेळ दिला जाणार आहे. माघारीची वेळ संपल्यानंतर प्रथम महापौर पदासाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यापाठोपाठ उपमहापौर पदासाठी पिठासन अधिकारी निवडणूक घेणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!