Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘एलिमेंटरी’च्या प्रश्‍नपत्रिका शाळांना ऑनलाइनच

Share
बारावीचे परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध; Hall Ticket available online for 12th std examination

नाशिक । प्रतिनिधी

शासकीय रेखाकला परीक्षेतील एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी कला संचालनालयाकडून शाळांना आता ऑनलाइनच प्रश्‍नपत्रिका पाठविली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्‍नपत्रिका शाळांना (ऑफलाईन) थेट दिल्या जात होत्या. मात्र ‘पेपर फुटीचा प्रयत्न झाला होता’, असे म्हणून संचालनालयाने या वर्षीपासून प्रश्‍नपत्रिका ऑनलाइन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी संचालनालयाकडे १६ नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळार आवश्यक तपशीलवार माहिती पाठविण्याचे निर्देशही दिले आहेत. दरम्यान, या परीक्षेसाठी सर्व विषयांच्या २८ लाखांपेक्षा जास्त प्रश्नपत्रिका छापून तयार ठेवल्या आहेत. मात्र, अचानक ऑनलाइन प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठविण्याचा निर्णय घेतल्याने या छापील प्रश्नपत्रिकांची रद्दी झाली आहे.

शिवाय लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे. कला संचालनालयातर्फे सप्टेंबरमध्ये रेखाकला परीक्षा घेतली जाते. यात एलिमेंटरी व इंटरमिजिएटचे प्रत्येकी चार विषय असतात. यंदा एलिमेंटरीसाठी ३ लाख ३० हजार व इंटरमिजिएटसाठी ३ लाख ८७ हजार असे ७ लाख १७ हजार विद्यार्थी बसले आहेत.

ही परीक्षा २६ ते २९ सप्टेंबर या दरम्यान होणार होती. त्याच्यासाठी त्या प्रश्नपत्रिकांचे संच वाटप झाले होते; पण २४ सप्टेंबर रोजी तांत्रिक कारण समोर करत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या व प्रश्नपत्रिका जमा करण्याचे आदेश संचालनालयाने दिले. त्यानंतर परीक्षेची पुढची तारीख १४ ते १७ नोव्हेंबर निश्चित केली होती, ती परत रद्द करत २७ ते ३० नोव्हेंबर अशी निश्चित केली; पण त्यासाठी परीक्षेच्या दोन तास आधी ऑनलाइन प्रश्नपत्रिका संच केंद्रावर पाठविला जाईल, असे संचालयाने सांगितले.

राज्यातील अनेक शाळेत वीज, इंटरनेट, संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन नाही. त्यामुळे एवढ्या कमी काळात ऑनलाइन प्रश्नपत्रिका संच पाठविणे योग्य नाही. पुढच्या वर्षीपासून याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी कला शिक्षकांनी कला संचालक राजीव मिश्रा यांच्याकडे केली होती.

मात्र, ही मागणी अमान्य करत यंदापासूनच याची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगण्यात आले. ८ नोव्हेंबर रोजी सर्व केंद्र प्रमुखांना व प्राचार्यांना त्यांच्या ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविण्यासाठी केंद्राची संपूर्ण माहिती, ईमेल आयडी, बँक खाते क्रमांक १६ नोव्हेंबरपर्यंत संचालनालयाच्या www.doa.org.in या संकेतस्थाळावर देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!