Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकच्या विसावा केंद्रातून १६३० मजूर रवाना

नाशिकच्या विसावा केंद्रातून १६३० मजूर रवाना

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सदर मजुर नाशिक माधील विसावा तसेच निवारा शेङमध्ये विविध शेल्टरमधील १६३० मजुर आज रेल्वेद्वारे नाशकातुन उत्तरप्रदेश – मध्य प्रदेश – बिहारसाठी रवाना होत असतांना युवा-अनुभव शिक्षा केंद्र तसेच छात्रभारतीचे कार्यकर्ते उपस्थित राहुन नाश्ता,पाण्याची बाटली,ओआरएस,फ्रुटी,भत्याचे पाकिटे,बिस्किटे तसेच प्रवासात लागणाऱ्या व खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, मनपा कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

- Advertisement -

महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात स्थलांतर..!
महाराष्ट्रात विविध राज्याची लोक आपला उदरनिर्वाह भागवण्यासाठी मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणुन महाराष्ट्रात मुंबई, पुणे, यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरीत होत असतात हे लोक मुंबईत काही वर्षांपासून वास्तव करत होते यात बरेच बिगारी कामगार तसेच विविध कंपनी मध्ये आणि फुटपाथवर छोटे मोठे व्यवसाय करणारे मजुरी करणारे असे हे स्थलांतरित मजुर कामगार मुंबईत स्थायिक होत असतात.

मुंबईत सर्व व्यवसाय ठप्प असल्याने पोट भरण कठीण होत आहे त्यामुळे आता या नागरिकांनी आपल्या गावी जाण्याची ओढ घेतली आहे. वाहतुक सुरळीत नसल्याने पायी प्रवास करतांना तहान ,भुक विसरुन फक्त गावाच्या दिशेने लोक ओढ घेत आहेत तरी या प्रवासात जिवाचे हाल होत आहेत. स्थलांतर करणारे लोकांसाठी बसची व्यवस्था करणेबाबत हालचाली केल्यानंतर आता शेकडो मजुर नासिकमधुन वाहनाद्वारे आपल्या घरी पोहचण्यासाठी राज्याच्या सीमेपर्यंत प्रवास करत घर गाठत आहेत.

भुकेने व्याकूळ झालेल्या पोटाला नाश्ता वाटप ;
मुंबई पुणे वरून मध्यप्रदेश, झारखंड, उत्तरप्रदेश या ठिकाणी आपल्या गावी भुक तहान सहन करत जाऊ नयेत यासाठी आम्ही केळी, बिस्किटे, पाणी बोटल, फ्रुटी ,शेंगदाणा चिकी भत्ता पँकेट वाटप करत आहोत.

स्थलांतरित मजुरांना आमचा एक हात मदतीचा ;
नाशिक मध्ये शासनाने लोकांसाठी जत्रा हॉटेल येथुन तसेच नाशिकरोङ येथून रेल्वे आणि बसेस सोडल्या जातात. गेल्या ८९ दिवसापासून युवा-अनुभव शिक्षा केंद्र आणि छात्रभारती विद्यार्थी संघटना तसेच बिलिफ संस्था पुणे यांच्याकडून १९०० नाश्त्याची पाकिटे मिळाली ज्यात भत्ता, पाणी, केळी, फ्रुटी इ. पदार्थ होते याचे वाटप केले. यामध्ये युवा-अनुभवचे नितिन मते व सागर माळोदे आणि छात्रभारतीचे समाधान बागुल, सदाशिव गणगे, देविदास हजारे, हजारे, राम सुर्यवंशी, संकेत गवई. तसेच राष्ट्र सेवा दलाच्या वंदनाताई मते, बिलीफ संस्थेचे मुक्ता नार्वेकर, अतुल गायकवाड आणि संगिनी महिला मंडळच्या अनिता पगारे, कल्याणी अनिता मनोहर यांनी सहकार्य करत मदतकार्य नाश्ता पॅकेटचे वाटप केले.

मालेगाव येथे ३०० कुटुंबाना किराणा पाठविला
नाशिक येथून मालेगाव या नाशिकच्या हॉट स्पॉट असलेल्या शहरात ३०० कुटुंबाना किराणा पाठविण्यात आला याकरिता गिता ताई, डाॅ.बरंट काका, नितीन मते व समाधान यानी सहकार्य व प्रयत्न केले

या मदतीसाठी महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ विशेष मदत व योगदान दिले .
नाशिक पुणे हायवे वर १५० लोकांना नाश्ता व पाण्याचे वाटप, नाशिक पुणे हायवे वर १५० स्थलांतरित मजुरांना नाश्त्याचे पाकीट व पाणी वाटप करण्यात आले, याकरिता बिलिफ संस्थेची मदत झाली नाशिक येथील २० कुटुंबियांना किराणा किट देण्यात आले वाटपासाठी सिमा व रतन यांनी सहकार्य केले

- Advertisment -

ताज्या बातम्या