Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ग्रामपंचायतींना प्रतीक्षा निवडणुका संपण्याची; जनसुविधेची कामे अडकली

Share

नाशिक । प्रतिनिधी

बागलाण, दिंडोरी, नांदगाव, निफाड अशा आठ तालुक्यांमधील ४८ ग्राम पंचायतींसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.गावातील जनसुविधेच्या कामांसाठी देण्यात येणारा निधी पंचायत समिती स्तरावरच अडवल्यामुळे आता ग्राम पंचायतींना निवडणूक संपण्याची वाट बघावी लागणार आहे. निवडणूक कालावधीत एकाही ग्राम पंचायतीला निधी वर्ग होणार नाही.

गावांमध्ये जनसुविधेच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र, यंदा देण्यात आलेला निधी पंचायत समिती स्तरावरच अडवल्यामुळे गावांच्या विकासाला खिळ बसली आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी व चांदवड या पाच पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्‍यांनी जनसुविधेचा निधी ग्राम पंचायतींना वर्ग केलेला नाही.

परिणामी,पंचायत समिती स्तरावर निधी का अडवला याचा जाब विचारुन त्यांच्याकडून अखर्चित निधीचा अहवाल मागविण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.यांनी ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना सांगितले.

तसेच समाधानकारक उत्तर न देणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.त्याअनुशंगाने परदेशी यांनी निधी रखवडलेल्या पाच गटविकास अधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असली तरी ग्राम पंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे त्यांना हा निधी वितरीत करता येणार नाही.त्यामुळे निवडणुका होण्याची वाट पहावी लागणार आहे.अन्यथा जनसुविधेच्या निधीवर पाणी सोडावे लागणार आहे.

…तर शिस्तभंगाची कारवाई
ग्रामस्तरावर जनसुविधेच्या कामांसाठी सहा महिन्यांपूर्वी निधी वर्ग झालेला असताना अद्याप त्याचे वितरण करु शकलेल्या गट विकास अधिकार्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!