Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आर्थिक वर्षात केवळ ६० टक्केच निधी खर्च; जिल्हा परिषद अध्यक्षा संतप्त, आज बैठक

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना २०१८-१९ या आर्थिक वर्षातील आतापर्यंत केवळ ६० टक्के निधी खर्च झाला आहे. यावर संतप्त झालेल्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी तातडीने बुधवारी (दि.१३) मुख्य कार्यकारी अधिकारी यासह विभागप्रमुखांची आढावा बैठक बोलविली आहे.

बुधवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता अध्यक्षांच्या दालनात ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत विकासकामे करण्यासाठी विभागांना शासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र, वेळात हा निधी खर्च होत नसल्याचे पाच वर्षापासून दिसत आहे. अखर्चित निधीची परंपरा यंदाही कायम आहे.

२०१७-१८ या आर्थिक वर्षातील तब्बल ८३.३९ कोटींचा निधी वेळात खर्च न झाल्याने शासनाकडे जमा झाला आहे. निधीचे नियोजन करण्यात पदाधिकार्‍यांचा आडमुठेपणा तसेच वेळकाढूपणा कारणीभूत असला तरी, प्रशासनाच्या नाकर्तेपणाही त्यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

हा निधी जमा होत असताना 2018-19 या आर्थिक वर्षातील खर्चाचे चित्र फारसे समाधानकारक नाही. आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीतील केवळ 60 टक्के निधी नियोजन होऊन खर्च झाला आहे. निधी खर्चासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यातही विद्यमान पदाधिकार्‍यांचा कालावधी संपुष्टात येत असून, नवीन पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रीया होणार आहे. यातही काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे निधी खर्चासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. वाढत्या अखर्चित निधीवर अध्यक्षा शीतल सांगळे यांसह सभापती मनीषा पवार ही आक्रमक झाल्या आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!