Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘आयटीआय’च्या तीस हजार जागा रिक्त

Share

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात असलेल्या शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या आहेत.

यंदाच्या प्रवेशप्रक्रियेतून १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रिक्त जागा जवळपास १० हजारांनी वाढल्या आहेत.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयटीआयसाठीची प्रवेशप्रक्रिया राबवली होती. सरकारी आणि खासगी आयटीआय मिळून राज्यात १ लाख ४८ हजार२४६ जागा उपलब्ध होत्या.

त्यातील २९ हजार ९५९ जागा रिक्त राहिल्या. यापैकी १० हजार ९४९ जागा खासगी आयटीआयमध्ये तर १० हजार १० जागा शासकीय आयटीआयमध्ये रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी एकूण २० हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!