Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विधानसभा २०१९ : विजयादशमीपासून प्रचाराचे सीमोल्लंघन; दिग्गजांचा तोफा धडाडणार

Share

नाशिक | प्रतिनिधी

उमेदवारी अर्ज माघारीची आज अंतिम मुदत असून त्यांनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. मंगळवारी (दि.८) विजयदशमीचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांकडून प्रचाराचे सीमोल्लंघन केले जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात प्रचाराचा धुराळा उडणार असून दिग्गजांंचा तोफा धडाडणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे.

शिवसेना नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. तर, भाजपा अध्यक्ष अमित शहा हे भगवान गड येथे दसर्‍या मेळाव्याला उपस्थित राहत प्रचाराचा नारळ वाढविणार आहे. नाशिक जिल्हा राजकीय दृष्टया हेवीवेट आहे.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघ काबीज करण्यासाठी युती व आघाडीने सर्व ताकत झोकली आहे. मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यांनी देखील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पुढील दिवसात भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचितचे डॉ.प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे ओवेसी यांचा सभा नाशिक शहर व जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांनी देखील त्यांच्या नेत्यांच्या सभा आपल्या मतदारसंघात व्हावी, यासाठी फिल्डीग लावली आहे. तसेच, युती व आघाडीच्या नेत्यांंच्या संयुक्त सभा आयोजनावरही स्थानिक नेते व पदाधिकार्‍यांचा भर आहे. त्यामुळे पुढील काळात दिग्गज नेत्यांच्या तोफा नाशकात धडाडणार आहे. सभा म्हटले की आरोप – प्रत्योरोपाच्या फैरी झडणारच. त्यामुळे राजकीय चिखलफेकमुळे मतदारांची फुल्ल टू करमणूक होणार आहे.

मोठया पक्षांकडून नेहमीप्रमाणे शहरातील हुतात्मा अंनत कान्हैरे मैदानाला पंसती देण्यात आली आहे. तसेच, शहरातील इतर मध्यम व छोटी विमाने आतापासूनच राजकीय पक्षांकडून बुक केली जात आहे.

स्टार प्रचारक यादीकडे लक्ष
राजकीय पक्षांंकडून स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे.अर्ज माघारीनतर प्रचाराला खर्‍या अर्थाने सुरुवात होईल. २८८ मतदारसंघ असल्याने प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या नेत्यांना जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे काही ठिकाणी दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या सभाचा फड गाजणार आहे.

हे असतील स्टार प्रचारक

भाजप-पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, उदयनराजे भोसले, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन.

शिवसेना – उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे,

राष्ट्रवादी – शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे,

काँग्रेस- सोनिया गांधी, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात

मनसे – राज ठाकरे, बाळा नांदगावकर

वंंचित – अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!