नाशिक-कांदला विमान सेवेला हिरवा कंदील; २२ ला उडान
Share

सातपूर । प्रतिनिधी
कच्छ भागातील कांंंदला ते नाशिक विमान सेवेला हिरवा कंदील देण्यात आला असून, २२ नोव्हेंबरला या सेवेला प्रांरंभ करण्यात येणार आहे. अलायन्स एअर लाईसच्या ७२ सिटर एटीआर माध्यमातून ही सेवा सूरू करण्यात येणार असल्याची माहीती मनिष रावल यांनी दिली.
नाशिकहुन ८:२० वाजता कांदला साठी विमान जाणार असून, ते कांदला येथे ११:१० वाजता पोहोचणार आहे. सकाळी ११:४० वाजता कांदला येथून विमान उड्डाण घेणार आहे. ते २:२४वाजता नाशिकला पोहोचेल. दोन विमानतळांदरम्यान कंदलाहून नाशिकला दररोज अंदाजे १ उड्डाणे राहणार आहे.
कांंदला-नाशिक हे राष्ट्रीय महामार्गाने ७७१ की.मी अंतर असून यासाठी वाहनाने १४ तासांचा वेळ लागणार लागतो . मात्र विमान सेवेमुळे तीनतासात हा प्रवास शक्य आहे. या सेवमुळे जामनगर, भूज भागातील नागरीकांसाठी मोठी सुविधा निर्माण होणार आहे.उडान अंतर्गत विमानाचा किमान विमान प्रवासभाडे हे २९०० राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदला हे पोर्ट असल्याने त्याचा लाभ या विमान सेवेला होणार आहे.
अलायन्स एअरलाईन्सच्या नाशिक विमानतळावरुन कांदला, अहमदाबाद, हैद्राबाद, पूणे या सेवा सूरू झाल्याने या माध्यमातून पर्यटकांना विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. नुकतीच आठ दिवसांपूर्वी पूण्याची सेवा सूरू करण्यात आली त्या सेवेलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे मनिष रावल यांनी सांगितले.