Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मंदीत तरुणाईचे सेवाक्षेत्रात काम; नाशिकच्या तरुणांनी थाटल्या आयटी कंपन्या; रोजगार निर्मितीत हातभार

Share

नाशिक । दिनेश सोनवणे

सध्या सगळीकडेच आर्थिक मंदीवरून घमासान माजले आहे. अनेक बड्या कंपन्यांनी आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कामगारांना कामावरून काढले. एकीकडे अनेक कंपन्यांचे शटडाऊन बघायला मिळत असताना नाशिकधील काही उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःच कपंनी सुरु करून  अनेक रोजगार उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामूळे स्टार्टअपला वाव मिळाला असून नाशिकमध्येही आयटी इंडस्ट्री मोठ्या संख्येने वाढण्यासाठीचे पोषक वातावरण देखील तयार झाले आहे.

देशातील धार्मिक स्थळांपैकी एक ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या शहरांत नाशिकचे नाव अग्रभागी घेतले जाते. नाशिकची आता शैक्षणिकदृष्ट्या ओळखही आता सातासमूद्रापार होताना दिसत आहे. पहिली ऑनलाईन डिक्शनरी बनविण्याचा मान नाशिककडे जातो. परदेशातील मनुष्यबळ अलिकडे घटलेले रोजगार, सर्वच औद्योगिक क्षेत्राला बसलेली मंदीची झळ यामूळे अनेकांचे रोजगार गेले.

यातून सावरण्यासाठी नाशिकच्या तरुणांनी प्रयत्न केलेले दिसून येत आहेत.
या तरुणांमध्ये कुणी अमेरीका, दुबईसारख्या ठिकाणी स्थित असलेल्या कंपन्यांमध्ये ऑनलाईन काम नाशिकमध्ये बसून करतात. तर कुणी नाशिकमधूनच ऑनलाईन कोर्सदेखील घ्यायला सुरुवात केली आहे. यातून मोठी उलाढाल सध्या होते आहे. तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारचे सातबारा ऑनलाईन करणे, तसेच इतरही ज्या काही योजना आहेत यामध्ये हातभार लावण्यासाठी ही तरुणाई सध्या कार्यरत आहे. शासनाच्या महत्त्वाकांशी योजनांमध्येही या तरुणाईला आर्थिक लाभ होताना दिसून येत आहे.

एवढेच नाही, तर अनेक उच्चशिक्षित तरुणांचा कृषी पर्यटनाकडेही कल वाढला असून त्यासाठी ते शेतीत वेगवेगळे बदल करत आहेत. अनेक वेगवेगळी फुड प्रोसेसिंग युनिट त्यांच्यामाध्यमातून सुरु झाले आहेत. प्रयोगशील उद्योग दाखल झाल्यानंतर अनेक शेतकर्‍यांना याठिकाणी आधूनिक शेतीचे प्रत्यक्ष धडेही दिले जात आहेत.

नाशिकची ओळख आता धार्मिक पर्यटनापुरतीच मर्यादित राहिलेली नसून आधुनिक शेतीचे माहेरघर तसेच आयटी क्षेत्रात अग्रभागी घेतले जाऊ लागले आहे. वातावरण निर्मिती झाली आहे, आता बड्या कंपन्या येण्यासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून कंपन्यांच्या प्रतिक्षेत येथील तरुणाई आहे.

शासकीय सेवांमध्येही संधी
शासनाच्या योजना, सेवा क्षेत्रासाठी निविदा निघतात. त्यानूसार कंपनी शासनाचे टेंडर घेते. प्रत्येक गोष्टीसाठी आता सॉफ्टवेअर लागतात त्यामूळे इंजिनियर्सची आवश्यकता तिथे भासते. तसेच शासनाच्या सात बारा, दाखले यासाठी ऑनलाईन सेवांचा अवलंब केला जात आहे तिथेही आयटी क्षेत्राला वाव चांगला आहे

.निलेश भदाने, इव्हर सॉफ्टटेक, नाशिक

कंपनी झाली वीस वर्षांची
२० वर्षांपुर्वी आयटी मधील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे समविचारी मित्र एकत्र आलो. परदेशात जनसंपर्क वाढवला. कंपन्यांची कामे मिळू लागली. वेळेत काम आणि कामाची अचूकता यामूळे आपोआप मार्केटींग होत गेली. कामाचा व्याप्ती वाढली. मनुष्यबळाची गरज भासूल लागली त्यानंतर जवळपास दहा व्यक्ती कंपनीत काम करत आहेत. आमच्या कंपनीची मार्केटींग टीम नाही. तरीदेखील आज कंपनी खुप चांगल्या स्तरावर काम करत आहे.
– सचिन पाटील, वेबड्रिमवर्क, नाशिक

आयटी क्षेत्राला नाशकात वाव
शैक्षणिकदृष्ट्या नाशिक आघाडीवर आहे. नाशिकमध्ये तयार झालेले इंजिनियर आपली हुशारी सिद्ध करण्यासाठी पुणे, मुंबई, दिल्‍ली, बंगलोर तसेच इतर देशात आपले नशिब आजमावतात. नाशिकमध्ये महाविद्यालये आहेत, तिथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून योग्य दिशा दिली तर स्थानिक मनुष्यबळ इतरत्र जाणार नाही परिणामी आयटी क्षेत्राला उभारी मिळेल.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!