Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शहर, जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त; अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सहा हजाराची फौज

Share
कर्फ्यूतील बंदोबस्तासाठी जिल्ह्यात दोन हजार पोलीस, Latest News Curfew Bandobast Police Ahmednagar

नाशिक । प्रतिनिधी

अयोध्याप्रकरणाचा निकाल आज  (ता.९) सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होण्याची शक्यता असून यापार्श्‍वभूमीवर शहर-जिल्ह्यात पोलीसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही दलांचे सुमारे ६ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या बहुचर्चित अयोध्याप्रकरणाचा निकाल देशवासियांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कोर्टाचा निकाल नक्की काय असणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, या निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

या पार्श्‍वभूमीवर गेली आठ दिवसांपासून शहर तसेच ग्रामिण पोलीस दलांनी त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठका घेत. सर्व धर्मियांना कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याचे तसेच सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषत: सोशल मिडियामध्ये या निकालाचे चुकीचे पडसाद उमटू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. व्हॉट्सअ‍ॅपसह इतर सोशल मिडियावर तथ्यहिन मॅसेज फॉरवर्ड करण्यात येतात. सोशल मीडियावरही संदेशाचे प्रचार-प्रसार करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तर पोलिसांकडूनही सोशल मीडियावरील पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.

याशिवाय, व्हॉटसऍप या सोशल मीडियावरील ग्रुप्सवर पोलिसांकडून संदेश पसरविण्यात येऊन शांतता बाळगण्याचे आणि प्रक्षोभक संदेशांचा प्रसार केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात १३ पोलीस ठाण्यांचा त्या त्या भागात बंदोबस्त असणार आहे.

तसेच गस्त पथके अधिक कार्यरत असणार आहेत.  एसआरपी, राखीव पोलीस दले, शीघ्रकृती दले तैनात ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील विशेषत: मालेगाव शहर व परिसरात विशेष दक्षता बाळगली जात आहे. ४० पोलीस ठाण्याअंतर्गत त्या त्या पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त असून मालेगावात राखीव तसेच अधिकची पथके तैनात करण्यात आली आहे. यासह ७०० होमगार्ड कार्यान्वीत करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

निकालाचा आदर करा
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा असतो. त्याचा आदर करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. निकाल लागण्यापूर्वी आणि निकाल लागल्यानंतर सोशल मिडियावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोठेही दोन धर्मांमध्ये मतभेद निर्माण करणारा संदेश, दुसर्‍या धर्मावर टिका करण्याचा प्रकार आढळून आल्यास याची गंभीर दखल घेण्यात येईल. पोलिस आपल्यापरीने कडक कार्यवाही करणार आहेत.
– विश्वास नांगरे पाटील, पोलिस आयुक्त

ओनली अ‍ॅडमीन
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक अथवा इतर सोशल मिडियावरील मॅसेज रोखण्याची जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमीन अथवा संबंधित व्यक्तीची असते. साधारणत: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे गुन्हे घडल्यास ते पुराव्यानिशी सिद्ध होतात, यामध्ये ग्रुप अ‍ॅडमीनला प्रमुख जबाबदार धरले जाते. यामुळे बहूतांश ग्रुप अ‍ॅडमीन सावध झाले असून व्हॉटसअपमध्ये असलेली ओनली अ‍ॅडमीन ही सिस्टीम कार्यान्वीत केली आहे. या काळात केवळ अ‍ॅडमीनच ग्रुपवर मॅसेज टाकेल. इतर सदस्यांना ग्रुपवर मॅसेज टाकता येणार नाहीत.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!