Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्जमाघारीचा शेवटचा दिवस

Share

नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीची सोमवारी (दि.७) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. शहरासह जिल्ह्यातील १५ मतदारसंघात बंडोबांनी दंंड थोपाटले आहे. प्रामुख्याने शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतील बंडोबांना थंड करण्यासाठी रविवारी पक्षपातळीवरुन मनधरणी सुरु होती. पक्षाच्या आदेशानंतर बंडखोर पंांढरे निशाण फडकवतील की निवडणूक लढविण्यावर ठाम राहतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघासाठी २३१ अर्ज वैध ठरले आहेत. युती व आघाडीत जागा वाटपात अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. नाशिक पश्‍चिमची जागा सेनेला न सुटल्याने या ठिकाणी नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे व मामा ठाकरे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तर, नाशिक पूर्वची जागा आघाडीने कवाडे रिपाइं गटाला सोडली आहे. मात्र, ऐनवेळी भाजपाने तिकीट कापल्याने बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला. सानप यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला. तर, कवाडे गटाकडून गणेश उन्हवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. या जागांवर कोण माघार घेते याकडे लक्ष लागून आहे.

नाशिक पश्‍चिममध्ये सेना नगरसेवकांनी भरलले अर्ज मागे घ्यावे, असे आदेश पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन देण्यात आले आहे. मात्र, बडगुजर व ठाकरे माघार घेतील व विलास शिंदे हे उमेदवारी करतील, अशी चर्चा आहे. तसे, झाल्यास सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होईल.

युतीत नांदगावची जागा शिवसेनेला सुटली आहे. मात्र, त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या जि.प.बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. रविवारी दिवसभर बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षपातळीवरुन प्रयत्न सुरु होते. त्यामुळे या प्रयत्नांना आज यश मिळेल का याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!