Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ऑनलाईन ६ लाखाची रक्कम लंपास; निवृत्त वर्ग १ च्या अधिकार्‍याला गंडा

Share

नाशिक । प्रतिनिधी

हॅकर्स तसेच भामटे सर्वसामान्य नागरीकांना विविध मार्गाने ऑनलाईन गंडा घालत असल्याचे प्रकार घडले आहेत. परंतु नाशकात मात्र एका वर्ग १ च्या अधिकार्‍याला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सबंधीत अधिकार्‍याला त्यांचे बँक खात्याशी संबंधित अ‍ॅप बंद झाल्याचे सांगत, त्यासाठीची माहिती जाणून घेत ऑनलाईन ६ लाख रुपयाना गंडा घातला आहे.

एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त अधिकार्‍यांला (रा. सहदेवनगर, गंगापूररोड) गुरुवारी (ता.७) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात संशयिताने विनोद कुमार यांच्या मोबाईल क्रमांकावर अ‍ॅप ब्लॉक झाले असल्याचे संदेश पाठविले. त्यांनी त्या संदेशातील लिंक ओपन करण्याचा प्रयत्न केला असता, ती लिंक ओपन झाली नाही. त्यामुळे त्यांनी ६२८९७६८४६४ या संशयिताच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला.

त्यावेळी संशयित ऑनलाईन भामट्याने अधिकार्‍याकडून त्यांचे नाव व जन्म तारीखेची माहिती जाणून घेत तो फॉर्म सबमीट केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेले दोन वेळा आलेले ओटीपी विचारूनही घेतले. त्याच माहितीच्या आधारे संशयिताने त्यांच्या नागपूरच्या रविनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत असलेल्या पेन्शन खात्यातून ६ लाख ८ हजार २०० रुपयांची रक्कम ऑनलाईन काढून घेत त्यांची फसवणूक केली.

सदरचा प्रकार सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान घडला. पैसे खात्या    वरून वर्ग झाल्याचा संदेश आल्यानंतर सबंधीत अधिकार्‍याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ नाशिक सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!