Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबारावीचा अभ्यासक्रम बदलणार

बारावीचा अभ्यासक्रम बदलणार

जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्ष हे बारावीच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष असणार आहे. या निर्णयाची पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाने केले आहे.

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नव्या अभ्यासक्रमाची घोषणा यापूर्वीच केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्या शिकविण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाचे हे शेवटचे वर्ष असणार आहे. २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध असतील.

जून २०२० मध्ये ही नवीन पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना मंडळामार्फत एप्रिल महिन्यात नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र, पुस्तके मे महिन्यापूर्वी बाजारात न आल्यास खासगी शिकवणी चालकांची मोठी गैरसोय होऊ शकते. तसेच बारावीच्या वर्गात जाणार्‍या विद्यार्थ्यांनाही पुस्तकांची वाट पाहात बसावे लागण्याची शक्यताही शिक्षक व्यक्त करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या