Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रेशन दुकानात मिळणार स्टेशनरी साहित्य

Share
'वन नेशन - वन रेशनकार्ड' अंतर्गत नवीन रेशनकार्ड नाही; सध्या सुरू असलेल्या रेशनकार्डद्वारेच मिळवता येणार योजनेचा लाभ, there is no new ration card for one nation one ration card breaking news

नाशिक । प्रतिनिधी

रेशन दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासानाने रेशन दुकानात वह्या, पुस्तेक, शालेयोपयोगी वस्तूंसह सर्वच प्रकारची स्टेशनरी ठेवण्यास परवानगी दिली आहे. या कृल्प्तीतून शासनाकडून रेशन दुकानदारांच्या कमीशन वाढीच्या मागणीला फाटा देण्यात आला आहे.

रेशन दुकानदारांच्या कमीशनवाढीसह कायम स्वरुपी मानधन देण्याची अनेक वर्षाची मागणी अद्यापही शासनाकडून प्रलंबितच आहे. निवडणुकीपुर्वी कमीशन वाढीसाठी दुकानदारांनी संप केला होता. मात्र, निवडणुकीनंतर मागण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, या आश्‍वासनावर दुकानदारांची बोळवण करण्यात आली होती.

परंतू त्याऐवजी शासनाने रेशन दुकानदारांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी रास्तभाव दुकानातून सार्वजनिक व्यवस्थेंतर्गत वितरीत होणार्‍या वस्तूंसह गव्हाच्या विशिष्ट जाती, तांदूळ, खाद्यतेल, पामतेल, कडधान्ये, डाळी, गुळ, शेंगदाणे, रवा, मैदा, चणापीठ आणि अगदी भाजीपाला ठेवण्यासह परवानगी दिली आहे.

आता नव्याने काढलेल्या आदेशानुसार वह्या, पुस्तके,पेन, असे शालेय वस्तूंसह सर्व प्रकारची स्टेशनरीही विक्रीस परवानगी दिली आहे. ही स्टेशनरी शासनाने निश्‍चित केलेल्या वितरकांद्वारे प्राप्त करुन घेऊन वस्तू आणि कमीशनबाबत त्यांच्याशी दुकानदारांनीच संपर्क साधण्याचे आदेश आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!