Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नंदिनी, वालदेवी व वाघाडी होणार प्रदूषणमुक्त; लवकरच कामाला सुरवात

Share

नाशिक। प्रतिनिधी

दक्षिण गंगा गोदावरी नदीतील प्रदूषण राखण्यासाठी आणि नदी स्वच्छतेसाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यानंतर आता शहरातील उपनद्या असलेल्या नंदिनी, वालदेवी व वाघाडी या उपनद्या स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आता निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभरानंतर या उपनद्या स्वच्छतेचे काम सुरू होणार आहे.

महापालिकेकडून 2019 या वर्षाच्या प्रारंभीच गोदा प्रदूषणमुक्तीसाठी नदीच्या स्वच्छतेच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. 43 लाख रुपये खर्चाचे वर्षभरासाठी नदी स्वच्छतेचे काम ठेकेदार एजन्सीला देण्यात आले असून सुमारे 18 कर्मचार्‍यांमार्फत गोदावरी स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. या एजन्सीकडून नदी पात्रातील पानवेली, शेवाळ केअरकचरा, प्लास्टीक कागद, निर्माल्य व इतर पाण्यातील कचरा काढण्याचे काम केले जात आहे. हे काम आनंदवल्ली ते तपोवन या दरम्यान होत आहे.

याच पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून शहरातील प्रमुख असलेल्या नंदिनी, वालदेवी व वाघाडी या उपनद्या स्वच्छतेच्या कामांची निविदा 14 फेब्रुवारी 2019 रोजी काढण्यात आली होती. मात्र, यातील काही अटी शर्ती संदर्भात आक्षेप आल्यानंतर ही निविदा प्रक्रिया महापालिकेने रद्द केल्यानंतर जून-जुलै 2019 दरम्यान पुन्हा निविदा जाहीर करण्यात आली.

आता ही निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. शेवटच्या टप्प्यातील कमिर्शियल ओपन झाल्यानंतर प्र्रक्रिया अंतीम टप्प्यात येऊन हे काम महिनाभरात पूर्ण होऊन काम सुरू होण्याची शक्यता आहे.

उपनद्यांची स्वच्छता अन् खर्च
वालदेवी नदीची स्वच्छता ही पाथर्डी शिवार ते चेहडी पंपींग पर्यत केली जाणार आहे. वर्षभराच्या या कामाची किंमत 46 लाखांच्यावर आहे. तर वाघाडी नदी स्वच्छतेचे काम म्हसरुळ शिवार ते गोदावरी नदी पात्र संगमापर्यत होणार आहे. वर्षभराच्या या कामांची किंमत 31 लाखांच्यावर आहे. नंदिनी नदीची स्वच्छता पिंपळगाव बहुला ते गोदावरी संगमापर्यत असून या वर्षभराच्या कामांची किंमत 62 लाखांच्यावर आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!