Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

अकरावी प्रवेशासाठी तिसरी विशेष फेरी; १ ऑक्टोबरला रिक्त जागांची यादी

Share

नाशिक । प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) या तिसर्‍या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उद्या  (दि.२३) सोमवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असून ही फेरी १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या फेरीत प्रवेश मिळणार्‍या विद्यार्थ्यांना प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी फक्त पंधरा दिवस मिळणार आहेत.

दहावीची नियमित परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर आता फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देण्यात येत आहेत. कमी टक्केवारी आणि अभ्यासक्रम अर्धा पूर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास अनेक महाविद्यालये नकार देत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या फेरीच्या दोन फेर्‍यांनंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक असल्याने त्यांच्यासाठी तिसरी फेरी राबवण्यात येणार आहे.

यापूर्वीच्या फेरीत प्रवेश मिळालेल्या परंतु कॉलेज बदलू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना २३ सप्टेंबरला सकाळी १० ते ५ या वेळेत वेबसाइटवरून प्रवेश रद्द करता येईल. प्रवेश रद्द करण्याची ही विद्यार्थ्यांना अखेरची संधी आहे. तसेच आजपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत नावनोंदणी करता येणार आहे. ही ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येत असून नाशिकमध्ये जवळपास साडेसतरा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे. तर अजूनही सहा ते साडेसहा हजार जागा रिक्त आहे.

तीन महिने प्रक्रिया राबवल्यानंतर प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य फेरी दोन ही अंतिम फेरी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरही बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करत शिक्षण विभागाने आणखी एक फेरी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

आत्तापर्यंत सत फेर्‍या
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आत्तापर्यंत एक बायफोकल फेरी, तीन नियमित फेर्‍या, एक विशेष फेरी आणि आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य अंतर्गत दोन अशा एकूण सात फेर्‍या राबविल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!