Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

मुस्लिम कुटुंबाकडून गरीब मुला-मुलींना दिवाळी भेट; एकात्मतेचे अनोखे दर्शन; स्वखर्चान दिले फटाके व मिठाई

Share

जुने नाशिक । फारुक पठाण

एकीकडे जातीपातीला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढत असतांना जुने नाशिकमध्ये राहणार्‍या रंगरेज या मुस्लिम परिवाराने स्वखर्चाने दिवाळीचे फाटाके, लाडू आणून महामार्ग व शहरातील रस्त्याच्या कडेला राहणार्‍या गोरगरीब, निराधार लहान मुला-मुलींना वाटप करुन त्यांनाही दिवाळीच्या सणात सहभागी करुन घेतले. त्यांच्या या उपक्रमामुळे रंगरेज कुटुंबियांचे कौतूक होत आहे.

एका खासगी कंपनीत काम करणारे दस्तगीर रंगरेज व त्यांची पत्नी गुड्डी रंगरेज यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम केला आहे. शहरातील द्वारका, मुंबईनाका, महामार्ग, टाकळीरोड, कन्नमवार पूल आदी ठिकाणी महामार्गाच्याकडेला राहणार्‍या कुटुंबातील लहान मुले व मुलींना त्यांनी खाऊ, लाडूचे वाटप केले. तर दिवाळीची मजा करण्यासाठी फटाके देखील दिले.

पैसेवाल्यांचीच दिवाळी अशी गैरसमज आता प्रचलीत होत आहे. मात्र मध्यमवर्गी मुस्लिम कुटुंबियांनी त्याला पुसण्याचा प्रयत्न केला. रंगरेज पती व पत्नी यांना समाजसेवेची आवड असल्याने ते शिवसेनेच्या माध्यमातून काम करतात. २०टक्के राजकारण ८० टक्के समाजकरण करीत त्यांनी गरीब मुला व मुलींना दिवाळीची अनोखी व अनमोल भेट दिल्याने त्यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता.

चेहर्‍यावर दिसला वेगळा आनंद
जातपातची बंधने न ठेवता आम्ही समाजसेवा करीत असतो. गरीब, निराधार मुला व मुलींना दिवाळीचा भरपूर आनंद घेता यावा, म्हणून आम्ही विविध ठिकाणी जाऊन त्यांना मिठाई व फटाके दिले. त्यांच्या चेहर्‍यावर दिसलेले वेगळे आनंद पाहून आम्हाला समाधान वाटले. यापुढेही असे कार्य करीत राहू.
दस्तगीर रंगरेज

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!