Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात १४८ उमेदवारांपैकी ११८ जणांचे डिपॉझिट जप्त

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये तब्बल १४८ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत उभी राहण्याची हौस या उमेदवारांना फेडावी लागली. ११८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

मतदारसंघात झालेल्या एकूण मतापैकी किमान १६ टक्के मते न मिळाल्यास उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते.

निवडणुकीत युती असो की आघाडी यात इच्छुक उमेदवारांच्या इच्छा आकांशांना धुमारे फुटले होते. १५ मतदारसंघात मोठी बंडाळी झाली. त्यातही युतीत अधिक कलह होता.

निवडणुकीत १४८ उमेदवार रिंगणात होते. त्यात मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे ५३ उमेदवार होते. तर, नोंदणीकृत पक्षांचे २३ व अपक्ष ७२ उमेदवार रिंगणात होते.

नामनिर्देशन पत्र दाखल करताना १० हजार रुपये डिपॉझिट भरणे आवश्यक असते. तर, राखीव मतदारसंघातील उमेदवारांना पाच हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते. संबंधित मतदारसंघात झालेल्या एकूण मतदारांच्या १६ टक्के मते उमेदवारास मिळाल्यास हे डिपॉझिट परत केले जाते.

मात्र, ऐवढी मते मिळण्यास उमेदवार अपात्र ठरल्यास ही रक्कम जप्त केली जाते. जिल्ह्यातील १४८ पैकी तब्बल ११८ उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे.

मतदारसंघनिहाय  डिपॉझिट जप्त उमेदवार संख्या
नांदगाव – १३
मालेगाव मध्य – ११
मालेगाव बाह्य – ७
बागलाण – ४
कळवण – ४
चांदवड – ७
येवला – ६
निफाड – ४
सिन्नर – ७
दिंडोरी – ३
नाशिक पूर्व – १०
नाशिक मध्य – ८
नाशिक पश्‍चिम – १७
देवळाली – १०
इगतपुरी – ७

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!