Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

१ नोव्हेंबरपासून बँकांच्या वेळेत बदल; जाणून घ्या नवे वेळापत्रक

Share

 

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील १८ राष्ट्रीयकृत बँकेच्या ३८६ शाखेच्या वेळेत क्षेत्रनिहाय बदल १ नोव्हेंबरपासून केला जाणार आहे. वेळेत झालेल्या बदलाची माहिती बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून ती प्रत्येक बँकेच्या फलकावरही लावण्यात येणार आहे.

बँकिंगमधील सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ईज २० अन्वये भारतीय बँकिंग संघटना यांनी ग्राहकांसाठी देशभर बँकेच्या कामकाजाच्या वेळेत क्षेत्रनिहाय बदल केले आहे. रहिवासी क्षेत्रात असलेल्या बँका सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर ग्राहकांसाठी या बँकेची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत असणार आहे.

त्याचप्रमाणे व्यापारी क्षेत्रातील बँकेची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत राहणार आहे. तर ग्राहकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत असणार आहे. इतर कार्यालयासाठी सकाळी १० ते ५ व ग्राहकांसाठी बँकेची वेळ सकाळी १० ते ४ असणार आहे.

जिल्ह्यात एकूण १८. राष्ट्रीयकृत बँका असून, त्यात स्टेट बँक, महाराष्ट्र बँक यांच्या शाखा मोठ्या प्रमाणात आहे. या राष्ट्रीयकृत बँकेत अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब, सिंध बँक, पंजाब नॅशलल बँक, स्टेट बँक, सिडिंकेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक, युनायटेड कमर्शियल बँक यांचा समावेश आहे.

या सर्व बँकेचे जिल्हयात ३८६ शाखा आहे.जिल्ह्यातील १८ राष्ट्रीयकृत बँकेच्या ३८६ शाखेच्या वेळेत १ नोव्हेंबरपासून क्षेत्रनिहाय बदल होणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!