Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

टोळक्यांच्या वादात एकावर गोळीबार

Share

नाशिक । प्रतिनिधी

वणी-सापुतारा मार्गावर नाशिकच्या एकावर गोळीबार केल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार टोळक्यांच्या वादातून झाल्याचे समजते. निखिल कटारे (रा. गंगापूर, नाशिक) असे या घटनेतील जखमीचे नाव आहे.

कटारे हा आपल्या तीन मित्रांसमवेत सापुतारा येथे फिरण्यासाठी गेला होता. परत येत असताना सुरगाणा तालुक्यातील वताबारी गावाजवळ ते लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले असता पाठलाग करत आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने आपल्याजवळील पिस्तूलमधून कटारेवर फायरींग करून पलायन केले.

यामध्ये कटारेच्या नाकाजवळ गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा प्रकार दुपारी घडला असतानाही वणी पोलीस व सुरगाणा पोलीस यांच्या हद्दीच्या वादात या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना तेथे धाव घ्यावी लागली.

रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. अखेर या प्रकरणी रात्री उशिरा वणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. हल्ला करणारे नाशिक शहरातीलच असल्याचे समोर येत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!