Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक पश्चिममध्ये डझनभरांचीं भाऊगर्दी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

इच्छुकांची सर्वाधिक भाऊगर्दी झालेला मतदारसंघ म्हणून नाशिक पश्चिम मतदार विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.बहुभाषिक मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाने वेगळी ओळख निर्माण केली आहे .या मतदारसंघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून भाजप व शिवसेनेच्या उमेदवारीसाठी प्रत्येकी डझनभर इच्छुक उमेदवार या ठिकाणी आहेत.त्यामुळे मतदारास संघांमध्ये बंडखोरीची लागण निश्चित होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघ हा सिडको आणि सातपूर हे दोन उपनगरे मिळून एक मतदारसंघ तयार झाला आहे.सिडको व सातपूर या भागात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तसेच शेजारच्या जिल्ह्यातून येऊन वास्तव्य करणारांची मोठी संंख्या आहे.याबरोबरच कामगारही या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे हा मतदारसंघ बहुभाषिक म्हणून ओळखला जातो.

या मतदारांवर कोणाचा प्रभाव अधिक पडतो यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघातील सिडकोमध्ये पहिल्या व दुसर्‍या योजनेत मूळ नाशिककर मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. तर उर्वरित भागांमध्ये कळवण,सटाणा,मालेगाव,देवळ्यासह धुळे,जळगाव या जिल्ह्यातील लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.

शेजारीच असलेल्या सातपूरमध्ये नाशिक जिल्ह्यातून व इतर जिल्ह्यातील नागरिक तसेच परप्रांतीय नागरिकांंचेही वास्तव्य आहे.अशाप्रकारे बहुभाषिक मतदारसंघ तयार झालेल्या येथील मतदारांकडून इच्छुकांंच्याही मतदानाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे वाढलेल्या आहेत. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत सन 2009 मध्ये मनसेचे नितीन भोसले यांनी विजयश्री मिळविली.त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.

या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसे व भाजपची लाट होती.या लाटेवर स्वार होत हे दोन्ही आमदार निवडून आले.अशीच लाट यावेळीही राहील की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवसेना व भाजपा युती बाबत अजूनही तळ्यात-मळ्यात आहे.त्यामुळे शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

उमेदवारी ही एकालाच मिळणार असल्याने उर्वरित इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता याच मतदार संघामध्ये सर्वाधिक आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारांंच्या भेटीगाठी सुरूही केलेल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!