Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

१५ मतदारसंघ मिळून ४ हजार ५७९ मतदान केंद्र

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात कायमस्वरुपी ४ हजार ४४६ इतकी मतदान केंद्र आहे.१५०० पेक्षा मतदार असलेली अवघी १३३ केंद्रच आहे. त्यामुळे तेवढीच सहायकारी मतदान केंद्र वाढली आहे. अशी जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी एकुण ४ हजार ५७९ मतदान केंद्र असतील. त्यात ६४ तात्पुरत्या मतदान केंद्रांचाही समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १५०० मतदारांपेक्षा जास्त मतदार असल्यास तेथे सहायकारी मतदान केंद्र उभारले जाते.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुर्वी ग्रामीण भागात १२०० पेक्षा जास्त मतदार संख्या आणि शहरात १४०० पेक्षा जास्त मतदार संख्या असल्यास तेथे सहायक मतदार केंद्र निर्मितीच्या सूचना होत्या. आता त्यात वाढ करत सरसकट १५०० मतदारांची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सहाय्यकारी मतदान केंद्रांची १५० पेक्षा अधिक होणारी संख्या काहीशी कमी होत ती १३३ इतकीच झाली आहे.

दरम्यान, यंदा आयोगाने ग्राऊंड फ्लोअरवरच मतदान केंद्र ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर जिथी लिफ्टची व्यवस्था असेल अशा ठिकाणी वरच्या मजल्यांवर ही केंद्र ठेवण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २०६ पैकी १९६ मतदान केंद्र हे ग्राऊंड फ्लोअरवर स्थलांतरीत केली आहे. ६ केंद्रांवर लिफ्टची व्यवस्था आहे. त्यामुळे ती पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आली आहे. तसेच १९६ पैकी ६४ केंद्र ही तात्पुर्ते स्वरुपातील आहे. जिल्ह्यात ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार आहेत. त्यांच्यासाठी ४ हजार ५७९ मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!