Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

‘रिंगटोन’ किती वाजावी याचा कालावधी ठरवणार ग्राहक

Share

नाशिक । प्रतिनिधी

फोन कॉलची रिंग किती वेळ वाजावी याचा निर्णय आता ग्राहकाच्या हाती राहणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉलची रिंग वाजण्याचा कालावधी ठरवण्याची मुभा ग्राहकांना असावी, असा प्रस्ताव मांडला असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

अनेकदा आपण कामाच्या गडबडीत असताना सतत वाजणारे कॉल्स डोकेदुखी ठरतात. ज्येष्ठ नागरिकांना कॉल येऊन गेल्याचेही कळतही नाही. अशा अनेक समस्या उद्भवत असल्याने ग्राहकांनी त्यांना हवा तसा रिंग वाजण्याचा कालावधी ठरवावा आणि टेलिकॉम कंपन्यांनी तशी मुभा ग्राहकांना द्यावी, असा प्रस्ताव ‘ट्राय’कडून मांडण्यात आला आहे. लवकरच यावर ‘ट्राय’ आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.

परदेशातील टेलिकॉम कंपन्या अशा पद्धतीची सेवा त्यांच्या ग्राहकांना पुरवतात. त्यासाठी विशिष्ट कोड तयार केला जातो. त्या कोडवर एसएमएस केल्यानंतर ग्राहकाला कॉलच्या रिंगचा अपेक्षित कालावधी विचारला जातो. साधारण १५ ते ४५ सेकंद, असा हा कालावधी असतो. त्याप्रमाणे ग्राहक पर्याय निवडू शकतो. भारतामध्ये व्होडाफोन कंपनीने ही सेवा देऊ केली असून पुढील काही दिवसांमध्ये सर्वच कंपन्या या सुविधा देतील, अशी शक्यता आहे.

या प्रक्रियेसंदर्भातील सर्व बाबींचा अभ्यास करून ट्रायने टेलिकॉम कंपन्यांपुढे प्रस्ताव मांडला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत त्यावर चर्चा करण्यासाठी आणि मते नोंदवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर हा निर्णय लागू करण्याचे धोरण आखले जाणार आहे, असे केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया मागवणार
सर्व कंपन्यांचे वेगवेगळे कोड तयार करण्यात येणार असून या कोडवर मेसेज केल्यास प्रत्येक ग्राहकाला त्याच्या फोनच्या रिंगचा कालावधी ठरवता येईल. या प्रक्रियेसाठी ट्रायकडून टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिक्रिया मागवण्यात आल्या असून त्यावर अभ्यास करून अंतिम मंजुरी ट्रायकडून दिली जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!