Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सरकारी पैशातून प्रचार ठरेल आचार संहितेचा भंग; प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी मांढरे

Share

नाशिक । प्रतिनिधी

सरकारी मालमत्ता अथवा पैशातून एखादया राजकीय पक्षाचा प्रचार होत असेल तर अशी कृती आदर्श अचार ंसंहितेचा भंग ठरेल. अशा प्रकरणात संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज, असल्याचे त्यांनी सांगितले.

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी शनिवारी (दि.२१) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तयारीची माहिती दिली. निवडणूक यंत्रणा आणि पोलीस विभाग पुर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले. पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यास तीन सहाय्यक निवडणूक अधिकार्‍यांची नियुक्ती यंदा करण्यात आली आहे. आचारंसंहितेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आदेश अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

आचारसंहितेची राजकीय पक्ष, उमेदवारांनी माहीती घ्यावी. शंका असल्यास निवडणूक विभागाशी संपर्क साधवा. खासगी, वैयक्तिक खर्चातून कुठलिही कृती मतदारांना प्रभाव पाडणारी असल्यास, तीचा खर्च संबधित उमेदवार अथवा संबधित राजकीय पक्षांच्या खर्चात धरला जाईल. त्यासाठी स्वतंत्र समित्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या समिती त्यावर लक्ष ठेवून राहाणार आहे. मतदान केंद्र, बुथ, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त, क्रीटीकल आणि व्हर्नरेबल मतदान केंद्र, मतदार यांद्या अद्यावतीकरण, मतदान यंत्र, अर्थात ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट आणि सर्वच बाबींच्या तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा स्तरावर अर्ज स्विकृती
विधानसभेसाठी प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित केले आहे. तर तहसीलदार दर्जाचे तीन अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्याच स्तारवर त्या-त्या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज वितरण, स्विकृती केली जाणार आहे. त्याच ठिकाणी उमेदवारांना अर्ज भरता येतील. केवळ शहरात चार विधानसभा मतदारसंघ असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य आणि देवळाली या चार मतदारसंघाचे अर्ज स्विकारले जातील.

संवेदनशील ६० मतदान केंद्र
१५ विधानसभा मतदारसंघात ६० संवेदनशील मतदार केंद्र आहे. संवेदनशील केंद्राचे नियम पाहाता उमेदवार असलेल्या ठिकाणाच्या केंद्राचाही त्यात समवावेश आहे.े त्यामुळे ही संख्या २००इतकी आहे.अंतिम मदार यादीनूसार जिल्ह्यात मतदारांची संख्या ४५ लाख २४ हजार ६६३ इतकी आहे. त्यात पुरुष मतदार २३ लाख ६६ हजार ४९५ इतकी आहे. तर, महिला मतदारांची संख्या २१ लाख ५८ हजार १३३ इतकी आहे. जिल्ह्यात १० हजार ५३८ इतके दिव्यांग्य मतदार आहे. तर, तृतीय पंथ मतदार ३५ इतके आहे.

प्रचारासाठी २८ लाखांची मर्यादा
उमेदवारांना प्रचारासाठी २८ लाख रुपयांची मर्यादा देण्यात आली आहे. मात्र, राजकीय पक्षांना प्रचार खर्चाची कोणतीही मर्यादा नसेल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर लेखा व वित्त विभागाचे अधिकारी सहायक खर्च निरिक्षक लक्ष ठेवतील.

प्रचार साहित्याचे दर निश्चित
राजकीय पक्ष, उमेदवार त्यांच्यां ऐपतीनूसार खर्च करत असतात. जेवनात डीलक्स आणि साधी थाळी, सर्वसाधारण दर निश्चित केले आहे. सभा मंंडपाचे वेगवेगळे प्रकार असून त्यानूसार दर आहेत. खुर्च्यांबाबत प्लास्टीक, आराम खुर्चीसह तीन ते चार प्रकार आहे. आता त्यानूसार दर ठरवले जातील, जेवण, नाश्ता, चहा, पाणी आदीचे देखील सुधारीत दर ग्राह्य धरले जातील.

मतदान केंद्रावर १५ सुविधा
लोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या मजल्यावर असलेली १९६ मतदान केंद्र विधानसभा निवडणूकीसाठी तळमजल्यावर स्थलांतरीत करण्यात आली आहे. सहा मतदान पहिल्या मजल्यावर असून त्या ठिकाणी लिफ्टची सुविधा आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व केंद्रांवर १५ प्रकारच्या सुविधा देण्यात येतील.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!