Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवरात्रोत्सवाची तयारी; मंदिरांंची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात

Share

नाशिक । प्रतिनिधी

आदिमाया आदिशक्ती देवीचा नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शहरातील देवी मंदिरात साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. बाजारपेठेतही विविध पूजा साहित्याची दुकाने थाटण्यात आली असून देवीभक्तांकडून खरेदीची लगबगही सुरू झाली आहे.

येत्या रविवारी (दि. २९) घटस्थापना होणार आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारीही देवीच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत. गंगेवर असलेल्या सांडव्यावरच्या देवी मंदिराची रंगरंगोटी सुरू असून येथील लायटिंग आदी सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. देवीच्या आभूषण, शस्त्रांना पॉलिश, मंडप आणि देवळात ठेवण्यात येणार्‍या देवीच्या परशु, चक्र, किरीट, बाजूबंद, कंबरपट्टे आदी शस्त्र-आभूषणांना चकाकी देण्याचे आणि डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. शहरातील सुवर्णकार कलावंतांकडे जुन्या साहित्यांची दुरुस्ती आणि नव्यांच्या मागणीनुसार काम करून दिले जात आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील वेगवेगळ्या देवी मंदिरात विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. त्या कार्यक्रमांच्या तयारीनेही वेग घेतला आहे.

नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिका देवीची रंगरंगोटी आणि मंदिर सजावटीचे काम सुरू करंण्यात आले आहे. ग्रामदेवतेचा उत्सव ९ दिवस चालणार असून देवीच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून लाखो भक्त नतमस्तक होतात. त्यानिमित्त भाविकांची सुरक्षा आणि अन्य सेवांसाठीही वेग आला आहे. यासह शहरातील विविध देवी मंदिरांसह उपनगरातील देवी मंदिरात नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आले आहे. या सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई आणि चौकाचौकात कमानी उभारण्यात येत आहे. घराघरांत साफसफाई, रंगकामाची धावपळ दिसून येत आहे.

घटस्थापनेचे साहित्य बाजारात
रविवार कारंजा व मेनरोड येथे घटस्थापनेसाठी लागणारी काळी माती, पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य, गहू, साळी, इतर कडधान्य, तसेच कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, दोरा, धूप-दीप, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, छोटे माठ, दिवे, पाटली व अन्य पूजा साहित्य उपलब्ध झाले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!