Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

निवेकच्या जलतरणपटूंचा इंटरक्लब स्पर्धेत वरचष्मा

Share

सातपूर । प्रतिनिधी

पंचवटी जलतरण तलावावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर क्लब स्पर्धेत निवेक क्लबच्या जलतरण पटुचे वर्चस्व स्थापित केले.यावेळी आयोजित विविध स्पर्धेत निवेकच्या जलतरणपटूंनी दमदार कामगिरी करून पदके पटकावली. त्यात ८ वर्षाआतील मुलींच्या गटात ईयाना पटेल ( ४ सुवर्ण), आध्या आहेर(४ कांस्य), निरवी पानगव्हाणे (२ सुवर्ण,१ कांस्य),आगरिमा सिंग (१ रौप्य) पदक पटकावले.
८ वर्षांआतील मुलांच्या गटात अंशुमन बाविस्कर (२ सुवर्ण, २ रौप्य), अक्षत गज्जर (२ सुवर्ण, १ रौप्य), शारव बाविस्कर ( १ रौप्य, २ कांस्य) पदकांची लयलूट केली.

१० वर्षांआतील मुलांच्या गटात आदित ब्राम्हणकर ( ३ सुवर्ण, १ रौप्य), लब्ध खिवंसरा (२ कांस्य) यांनी तर १० वर्षांआतील मुलींच्या गटात श्रेया सूर्यवंशी (२ रौप्य, २ कांस्य), काव्य शहा (२ रौप्य, १ कांस्य), वेदिका सळसिंगेकर (३ सुवर्ण, १ कांस्य)पुरस्कार पटकावले.

१२ वर्षांंआतील मुलांच्या गटात आदित्य कुवर (४ सुवर्ण), १४ वर्षाआतील मुलींच्या गटात श्रेया जोशी(४ सुवर्ण),१४ वर्षाआतील मुलांच्या गटात प्रितम शाहा(२ रौप्य, १ कांस्य), कौशिक सळसिंगेकर (२ कांस्य), १७ वर्षांआतील मुलींच्या गटात वैभवी देसाई ( ४ सुवर्ण), ख़ुशी भंडारी (२ रौप्य, २ कांस्य),१७ वर्षाआतील मुलांच्या गटात आर्य साखरे (३ सुवर्ण,१ रौप्य), क्रिशीराज भगत (१ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य) पदकांची लयलूट करण्यात आली.

यासोबतच काही जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यात सेवी रकिबे, पलक पाटील, मीतुल सिंग, जय ब्राम्हणे, विनायक तांबे हे सर्व जलतरणपटू निवेक क्लबच्या जलतरण तलावावर नियमितपणे राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक हिरेन बुझरुक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करतात.

या जलतरणपटूंच्या कामगिरीबद्दल स्विमिंगपूल चेअरमन प्रशांत डबरी व निवेकचे कर्मचारी तसेच सहायक प्रशिक्षक विशाल ढगळे, संतोष विश्वकर्मा, बापू बोरसे, गोपाल सदगुणे, रमेश विश्वकर्मा, नामदेवरावम निकम, डी. डी. महाजन, भारत गाडेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!