Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूर धरणातून १ हजार ७०८ क्यूसेक विसर्ग; जायकवाडी भरले शंभर टक्के; सोळा दरवाजे उघडले

Share
वैतरणाचे एक टीएमसी पाणी नाशिकला मिळणार; Nashik will get one TMC water from Vaitarna

नाशिक । प्रतिनिधी

धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मागील एक आठवड्यापासून गंगापूर धरणातून विसर्ग कायम आहे. मंगळवारी (दि.१७) गंगापूर धरणातून १ हजार ७०८ क्यूसेक विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदामाई दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, नाशिकहून होणार्‍या विसर्गामुळे जायकवाडी धरण हे शंभर टक्के भरले असून धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गत एक आठवड्यापासून जिल्ह्यात पुनरागमन झाले आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या धरणांच्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या आंबोली परिसरातही पाऊस सुरू आहे. गंगापूर धरण हे शंभर टक्के भरले आहे. ं

सोमवारीदेखील १७०८ क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ कायम असून पूरसदृश परिस्थिती पहायला मिळत आहे. दरम्यान, नाशिकहून मराठवाड्याकडे जात असलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी २०१६ नंतर पहिल्यांदाच ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून दहा हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. विसर्गामुळे दुष्काळी बीड, लातूर या जिल्ह्यांंची तहान भागली जाणार आहे. तसेच, पिण्यासाठी पाणी व शेतीसांठी आवर्तनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

धरणातील विसर्ग
दारणा – ११००
गंगापूर – १७०८
नांदूरमध्यमेश्वर – ७९२४

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!